आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असिनला 'आयटम' शब्दाची ऍलर्जी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'गजनी' चित्रपटातून पदार्पण करणार्‍या असिनला आयटम या शब्दाचेही वावडे आहे.
बॉलिवूडमध्ये सध्या सर्वत्र आयटम साँगची धूम असताना असिनने आतापर्यंत एकही आयटम साँग केलेले नाही. याबद्दल तिला विचारले असता ती म्हणाली की, मला आयटम शब्दच आवडत नाही. हा फारच छोटा शब्द आहे. त्यामुळे सध्या तरी मी आयटम साँग करण्याच्या विचारात नाही.
मी डान्स नंबरच्या विरोधात नाही आणि इतराचे पाहून मीसुद्धा हेच केले पाहिजे. असा मी कधी विचारही करत नाही. खरंतर एका अभिनेत्रीसाठी आयटम साँग आवश्यक नाही, पण भविष्यात चित्रपटाच्या मागणीनुसार किंवा दिग्दर्शकाच्या सांगण्यावरून मी आयटम साँग करू शकते.
'हाऊसफुल 2' मध्ये असिनचा लूक वेस्टर्न होता तर अलीकडेच रिलीज झालेल्या 'बोल बच्चन'मध्ये ती देसी रूपात दिसली. यावर ती म्हणते, पोशाखात विविधता नसली तरी चालते पण पात्रात असायला हवी. पाश्चात्य आणि भारतीय पोशाखात तुला कोणते पोशाख आवडतात. यावर ती म्हणाली की, मला दोन्हीही पोशाख आवडतात. फक्त तुम्ही त्याला कसे सादर करता यावर ते अवलंबून असते. बॉलिवूडमध्ये नंबर एकची स्पर्धा आहे का? यावर ती म्हणते की, स्पर्धा तर आहे पण मी माझ्याच कामावर लक्ष देत असते. इतरांबरोबर स्पर्धा करण्यापेक्षा मी स्वत:शीच स्पर्धा करते.
संधी मिळाल्यास बिकनीत नक्की देणार हॉट सीन... इति असीन
अक्षय-असीन चक्क एकत्र, आखिर मामला क्या है ?
असीन म्हणते मी सिंगलच ; सलमान आणि धोनीसोबत नाव जोडण्याला दिला नकार