आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'DAY : पाहा बबली गर्ल आएशाची खास छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
"मेरी चुनर उड़ उड़ जाये" या म्युझिक व्हिडिओद्वारे आपल्या करिअरला सुरुवात करणारी अभिनेत्री आएशा टाकिया हिचा आज (10 एप्रिल) 28 वा वाढदिवस आहे. 2004मध्ये 'टार्जन द वंडर कार' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेणा-या आएशाला तिच्या पहिल्याच सिनेमासाठी फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार मिळाला होता. याचवर्षी तिला 'दिल मांगे मोअर' या सिनेमासाठी मोस्ट प्रॉमिसिंग न्यूकमरच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर आलेले सोचा ना था, शादी नंबर वन, होम डिलीव्हरी हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर आपटले. मात्र 'डोर' या सिनेमात हटके भूमिका साकारुन आएशाने पुन्हा अनेक पुरस्कार आपल्या नवी केले. या सिनेमासाठी आएशाला झी सिनेचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता.
इतकेच नाही तर 'सुपर' या टॉलिवूड सिनेमासाठीसुद्धा तिला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. 2009 मध्ये आलेल्या 'वाँटेंड' या सिनेमात सलमान खानसोबत काम करणा-या आएशाच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले.
मोठ्या पडद्याप्रमाणेच छोट्या पडद्यावरही आएशाचे दर्शन घडले. 'सूरक्षेत्र' या सांगितिक कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा आएशाने सांभाळली होती.
आएशाला वाढदिवसाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा आएशाची खास छायाचित्रे...