(छायाचित्रेः गरब्यात सहभागी झालेली हुमा कुरैशी)
महेसाणा (गुजरात) : सध्या सर्वत्र नवरात्री आणि गरब्याची धूम दिसत आहे. विशेषतः गुजरातमध्ये हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. महेसाणा येथील शंकुझ वॉटर पार्कमध्य नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने आयोजित शंकुझ दांडिया 2014 मध्ये बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री हुमा कुरैशी सहभागी झाली होती. गरब्यात हुमाने
आपल्या उपस्थितीने चारचाँद लावले.
डेढ इश्किया, एक थी डायन, गँग्स ऑफ वासेपूर यांसारख्या सिनेमांतून आपल्या अभिनयाची छाप सोडणा-या हुमाने यावेळी आपल्या अदांनी तरुणाईची मने जिंकली. येथे तिने तरुण-तरुणींसोबत ताल धरला आणि सेल्फीची हौस भागवून घेतली.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला गरब्यात क्लिक झालेली हूमाची खास झलक छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहोत. पुढील स्लाईड्समध्ये पाहा गरब्यात तरुणाईसोबत हुमाने कसे केले एन्जॉय...