आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actress Katrina Kaif From Boom To Bang Bang

'बूम'पासून ते 'बँग बँग'पर्यंत कतरिना कैफच्या Looksमध्ये आलेला बदल, पाहा PIX

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('बँग बँग' (L) आणि 'बूम' (R)मधील कतरिनाचा लूक)
मुंबईः कतरिना कैफ बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. परदेशातून आलेल्या या तरुणी केवळ अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये यशाची चव चाखली नाही, तर सिनेरसिकांच्या मनातही स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. 'धूम 3'नंतर आता पुन्हा एकदा कतरिना 'बँग बँग'द्वारे मोठ्या प‍डद्यावर धूम करायला सज्ज झाली आहे.
आपल्या खासगी आयुष्याला नेहमी मीडियापासून दूर ठेवणा-या कतरिनाने वयाच्या 14व्या वर्षी ग्लॅमर इंडस्ट्रीत पदार्पण केले. एक सौंदर्य स्पर्धा जिंकल्यानंतर तिला पहिला ब्रेक मिळाला होता. सिनेमात पदार्पणाच्या वेळी कतरिना बरीच लठ्ठ होती. मात्र आता तिच्या लूक्समध्ये बराच बदल झाला आहे.
लंडनमध्ये करायची मॉडेलिंगः
काही वर्षांनी कतरिनाने लंडनमध्ये प्रोफेशनल मॉडेलिंग सुरु केले होते. अनेक जाहिरात एजन्सीसाठी तिने काम केले. लंडन फॅशन वीकमध्ये ती दरवर्षी सहभागी व्हायची. याच काळात लंडन बेस्ड दिग्दर्शक काइजाद गुस्तैद यांचे लक्ष कतरिनाकडे गेले आणि त्यांनी तिला 'बूम' या सिनेमासाठी कास्ट केले.
महेश भट्ट लाँच करणार होते कतरिनालाः
2003 मध्ये 'बूम'मधून फिल्मी करिअरला सुरूवात करणाऱ्या कतरिनाविषयी सांगितले जाते, की दिग्दर्शक महेश भट्ट यांना कतरिनाला लाँच करायचे होते. 'साया' या सिनेमामध्ये जॉन अब्राहमसह कतरिनाला फायनल केले होते. परंतु हिंदी भाषा अवगत नसल्याने कॅटने हा सिनेमा सोडला.

कतरिनाचे फिल्मी करिअरः

ब्रिटीश वंशाच्या या अभिनेत्रीने 2003 मध्ये फिल्मी करिअरला सुरुवात केली. या सिनेमात तिची इमेज खूप बोल्ड दाखवण्यात आली होती. पहिलाच सिनेमा फ्लॉप झाल्यानंतर कतरिनाने दाक्षिणात्य सिनेमांची वाट धरली. 2004 मध्ये तिचा पहिला तेलगू सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमाने चांगला व्यवसाय केला.

बॉलिवूडचे दिग्दर्शक रामगोपाल वर्माने 'सरकार' (2005) या सिनेमामध्ये अभिषेक बच्चनच्या प्रेयसीची छोटी भूमिका तिला दिली. त्यानंतर कतरिनाला सलमान खान अभिनीत 'मैनें प्यार क्यों किया'मध्ये ब्रेक मिळाला. सिनेमा हिट ठरला आणि सलमान खानच्या मदतीने कतरिनाचे करिअर यशाच्या शिखराकडे वाटचाल करायला लागले. आतापर्यंत कतरिना 'हमको दीवाना कर गये', 'नमस्ते लंडन', 'पार्टनर', 'वेलकम' ‘न्यूयॉर्क’, ‘अजब प्रेम की गजब कहानी’, ‘राजनिती’, ‘धूम-3’सारख्या हिट सिनेमांमध्ये झळकली आहे.

पुढील स्लाइड्समध्ये पाहा बूमपासून ते बँग बँगपर्यंतच कतरिना कैफचे वेगवेगळे अंदाज...