आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actress Movie Released In September 2014

सप्टेंबरमध्ये रंगणार प्रियांका-दीपिकामध्ये फाइट, या अभिनेत्रीसुद्धा देणार टक्कर!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('मेरी कोम' सिनेमाच्या पोस्टरवर अभिनेत्री प्रियांका चोप्रा)
मुंबई - बॉक्स ऑफिसवर व्यवसायाचा नवा विक्रम बनवण्याबरोबरच आपल्या चित्रपटांचा खर्च भरून काढण्याची जबाबदारी सप्टेंबरमध्ये बॉलिवूडमधील प्रमुख नायिकांवर राहणार आहे. कारण या नायिकांचे सहनायक एक तर नवोदित आहेत किंवा स्टारडम नसलेले आहेत.
सप्टेंबरमध्ये बॉलिवूडमधील प्रमुख नायिकांचा 'वॉर' रंगणार आहे. यामधील पहिला चित्रपट प्रियांका चोप्रा अभिनीत 'मेरी कोम' आहे. चित्रपटासाठी प्रियांकाला खूप मेहनत घ्यावी लागली. 'मेरी कोम'कडे प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी तिचा स्टारडम, चित्रपटाचा प्रोमो आणि संगीत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
प्रियांकाचा मागील वर्षात सप्टेंबरमध्येच प्रदर्शित झालेला 'जंजीर' सुपरफ्लॉप ठरला होता. आता 'मेरी कोम'द्वारे अपयशाचा डाग धुवून टाकण्याचा तिचा प्रयत्न राहील. सुप्रसिद्ध मुष्ठियोद्धा मेरी कोमला पडद्यावर प्रत्यक्षात उतरवण्यात प्रियंका किती यशस्वी ठरेल, हे चित्रपटाच्या 24 जुलै रोजी प्रदर्शित होणार्‍या ट्रेलरवरून कळू शकेल.
सप्टेंबर 2014 या अभिनेत्रींचे सिनेमे होणार आहेत रिलीज -
5 सप्टेंबर
मेरी कोम : प्रियांका चोप्रा
दावत-ए-इश्क : परिणीती चोप्रा
चार फुटिया छोकरे : सोहा अली खान
12 सप्टेंबर
फाइंडिंग फॅनी : दीपिका पदुकोण
क्रिएचर : बिपाशा बसू
19 सप्टेंबर
खूबसुरत : सोनम कपूर
डॉ.कॅबेई : इसाबेल (कतरिनाची बहीण)
26 सप्टेंबर
मुंबई 125 किमी : वीणा मलिक.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या सिनेमे आणि त्यातील नायिकांविषयी...