(अभिनेत्री नेहा धुपिया स्पेनमध्ये सुटी एन्जॉय करताना)
अभिनेत्री नेहा धुपिया सध्या स्पेनच्या इबिजामध्ये हॉलिडे एन्जॉय करत आहे. येथे धमाल-मस्ती करतानाची छायाचित्रे सोशल मीडियावर पोस्ट केली आहेत.
सन बाथ घेताना, बीचवर कलरफूल ड्रेसेससह बीडेड हॅटमध्ये आणि स्पेनच्या रस्त्यांवर क्लिक केलेली ही छायाचित्रे आहेत. या छायाचित्रांवरुन नेहाला ट्रॅव्हलिंग किती पसंत आहे, हे दिसून येतं.
फिरणे एवढे का आहे पसंत?
फिरण्याविषयी नेहा म्हणते, ''माझ्या मते नवनवीन ठिकाणी फिरल्यामुळे माणुस फ्रेश होतो. तुम्ही ब्रॉड माइंडेड होत जाता. माझे वडील नेव्हीत होते. त्यामुळे बालपणापासूनच मी ट्रॅव्हल करत आहे. कोच्चिमध्ये माझा जन्म झाला आणि येथे मी मोठे झाले. काही वर्षे दिल्लीत काढली. उन्हाळ्याच्या सुट्या माझ्यासाठी नवीन ठिकाणी फिरण्यासाठी असायच्या. मी खूप फिरले आहे. खूप प्रवास केला आहे. यामुळे मला लोकांना जवळून बघायला मिळतं. अभिनयाकडे वळण्याचे कारणच हे होते, की शूटिंगच्या निमित्ताने वेगवेगळ्या शहरांत फिरायला मिळतं.''
आवडते हॉलिडे डेस्टिनेशन?
ब-याच आहेत. मला ज्याठिकाणी ऊन, पाणी, वाळू आहे, तेथे फिरायला जाणे पसंत आहे. यासाठी गोवा आणि ऑस्ट्रेलिया हे नेहमीपासूनच माझी आवडती ठिकाणे आहेत.
एखादी अशी जागा जिथे वारंवार जाण्याची इच्छा होते?
ऑस्ट्रेलियाचे गोल्ड कोस्ट. 2002 मध्ये याठिकाणी मी पहिल्यांदा गेले होते. ही जागा स्वर्गापेक्षा कमी नाहीये. सुंदर बीच, हिरवळ मन प्रसन्न करते. मला सर्फिंग करणे पसंत आहे, त्यामुळे येथील बीचवर माझा वेळ खूप चांगला जातो.
फोटो साभार - सर्व छायाचित्रे नेहा धुपियाच्या फेसबुक अकाउंटवरुन घेण्यात आली आहेत. पुढील स्लाईड्समध्ये पाहा स्पेनच्या इबिजामध्ये सुटी एन्जॉय करणा-या नेहाची खास छायाचित्रे...