(अर्पिता खान)
मुंबई- पत्नी किरण राव आणि मुलगा आजादसह
आमिर खान अर्पिताच्या लग्नात सामील झाला होता. हैदराबादहून मुंबईला परतल्यानंतर त्याने सांगितले, की वधू अर्पिताने कुटुंबीयांसाठी एक पत्र लिहिले. त्यामध्ये तिने प्रत्येत सदस्याविषयी काही ना काही लिहिले आहे. सर्वांचे आभार व्यक्त केले. ती खूप भावूक झाली आणि पत्र वाचू शकली नाही. त्यावेळी
प्रियांका चोप्राने पत्र वाचून दाखवले. तिचे पत्र ऐकून सर्वांच्या अश्रुचा बांध फुटला.
अर्पिताने पत्रात लिहिले, 'मी खूप नशीबवान आहे, की मला असे कुटुंब मिळाले. सोहेर भाईचे लग्न होईपर्यंत आम्ही एकच खोली शेअर करत होतो. ते माझ्या मित्राप्रमाणे आहेत. अरबाज भाई माझे मार्गदर्शक आहेत. त्यांनी मला नेहमी योग्य आणि अयोग्य यातील फरक सांगितला. सलमान भाई मोठ्या मनाचे आहेत. त्यांच्यासाठी मी जे करते, त्यांना ते कधीच चुकीचे वाटत नाही. मी जे केले, त्याला त्यांनी सपोर्ट केला.' अर्पिताने
आपल्या पत्रात सलीम खान, सलमा खान आणि हेलन यांचेही आभार मानले. अर्पिताचे पत्र प्रियांका जेव्हा वाचत होती, तेव्हा घरातील प्रत्येक सदस्य भावूक झाला होता.
आमिरने लग्नात 'गुलाम' सिनेमाचे 'आती क्या खंडाला' गाणे गायले. सलीम खान यांनीसुध्दा एक गाणे गायले. सलमान, सोहेल आणि अरबाज यांनी डान्स केला. तिघांचा परफॉर्मन्स बराच वेळ चालू होता. तिघांच्या डान्स परफॉर्मन्समध्ये आमिरलासुध्दा डान्स करायला लावला. मात्र त्याला कोणत्यात स्टेप्स लक्षात नव्हत्या. म्हणून त्याने सलमानला फॉलो केले. अर्पिताची विदाईवेळी आमिरने सर्वांना रडण्यास आणि भावूक होण्यास मनाई केली. त्याने सांगितले मुलीची विदाई नव्हे त्यांच्या घरी एक मुलगा येत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अर्पिताच्या लग्नातील काही न पाहिलेली छायाचित्रे...