आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actress Reena Roy Undergoes Weight Loss Operation

रिना रॉयने वर्षभरात कमी केले 25 किलो वजन, या अभिनेत्रीसुद्धा झाल्या Fat to Fit

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः रिना रॉय)

मुंबईः गतकाळातील प्रसिद्ध अभिनेत्री रिना रॉय यांनी एका वर्षात आपले तब्बल 25 किलो वजन कमी केले आहे. बातमी आहे, की यासाठी त्यांनी बेरियाट्रिक शस्त्रक्रिया करुन घेतली आहे. या शस्त्रक्रियेच्या माध्यमातून अति लठ्ठ व्यक्तींना वजन कमी करण्यास मदत मिळते.
या शस्त्रक्रियेच्या माध्यमातून शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी केली जाते. रिया रॉय 2000 मध्ये शेवटच्या वेळी 'रेफ्युजी' या सिनेमात झळकल्या होत्या. त्यानंतर त्यांनी सिनेसृष्टीला रामराम ठोकला.
स्थूल शरीरामुळे अनेक व्याधी जडण्याची भिती असते. मधुमेह, अतितणाव तसेच झोपेचे विकार अशा अनेक त्रासाचे मूळ हे वाढलेले वजन असते. त्यामुळे रिना रॉय यांनी ही सर्जरी करुन घेतली. मध्यंतरीच्या काळात त्यांचे वजन बरेच वाढले होते. रिना रॉय यांच्याप्रमाणेच बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री आपल्या फिट बॉडी आणि वजनासाठी कॉन्शियस आहेत. येथे अनेक अभिनेत्रींनी सिनेसृष्टीत यश मिळवण्यासाठी आणि ग्लॅमरस दिसण्यासाठी वजन कमी केले आहे. या अभिनेत्री आज बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये सामील आहेत.
एक नजर टाकुया अशाच काही अभिनेत्रींवर, ज्यांनी ग्लॅमरस लूकसाठी वजन कमी केले...
बेरियाट्रिक सर्जरी म्हणजे काय?
बेरियाट्रिक शस्त्रक्रियेच्या माध्यमातून शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी केली जाते. या तीन प्रकारच्या शस्त्रक्रिया आहेत. यामध्ये लॅप बँड, स्लीव गॅस्ट्रिकटॉमी आणि गॅस्ट्रिक बायपास सर्जरीचा समावेश आहे. यातील सर्वात लोकप्रिय प्रकार म्हणजे पोटाचा आकार कमी करणे. यामुळे रुग्णाची भूक कमी होती. परिणामी भविष्यकाळात त्याचे वजन कमी होण्यास मदत होते. लॅप्रोस्कोपिक पद्धतीने ही शस्त्रक्रिया करण्यात येते. या सर्जरीच्या माध्यमातून दीड ते दोन वर्षांत 60-65 टक्के वजन कमी केले जाते. यासाठी साधारणतः दोन ते तीन लाखांचा खर्च येतो.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या बॉलिवूडमधील अशा काही अभिनेत्रींविषयी ज्यांनी आपले बरेच वजन कमी केले...