(सोहा अली खान)
मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री सोहा अली खान नवाब मन्सूर अली खान आणि शर्मिला टागोर यांची सर्वात धाकटी मुलगी आहे. सोहाचा थोरला भाऊ
सैफ अली खान बॉलिवूडमध्ये गेल्या पंधरा वर्षांपासून कार्यरत असून अनेक हिट सिनेमे त्याच्या नावावर आहेत. तर सोहा बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यात अयशस्वी ठरली आहे. आज सोहा अली खान 36 वर्षांची झाली आहे. याकाळात सोहा बॉलिवूड अभिनेता कुणाल खेमूसोबत डेट करत आहे.
4 ऑक्टोबर 1978 रोजी दिल्लीत जन्मलेल्या सोहा अली खानने दिल्लीतील ब्रिटीश स्कूलमधून
आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मॉर्डन हिस्ट्रीत पदवी प्राप्त केली. पुढे तिने ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीतून इंटरनॅशनल रिलेशन्स या विषयात पदव्यूत्तर पदवी प्राप्त केली.
फोर्ड फाउंडेशन आणि सिटी बँकेत केले काम...
सोहाने मास्टर डिग्री प्राप्त केल्यानंतर सिनेमांकडे न वळता फोर्ड फाउंडेशन आणि सिटी बँकेत नोकरी करणे पसंत केले. मात्र नंतर तिची रुची अभिनयात वाढल्यानंतर तिने सिनेसृष्टीकडे आपला मोर्चा वळवला.
बंगाली सिनेमाद्वारे केले पदार्पण...
सोहाने 2004 मध्ये 'इति श्रीकांता' या बंगाली सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर शाहिद कपूर स्टारर 'दिल मांगे मोर' या सिनेमाद्वारे बी टाऊनमध्ये एन्ट्री घेतली. या सिनेमात सोहासोबत आयशा टाकिया आणि ट्युलिप जोशी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. 'प्यार में ट्विस्ट' आणि 'शांदी नंबर वन' हे सिनेमे फ्लॉप ठरल्यानंतर तिने बंगाली सिनेमात काम केले. 2005 मध्ये 'अंर्तमहल' हा तिचा बंगाली सिनेमा रिलीज झाला.
पुढे सोहा
आमिर खान स्टारर 'रंग दे बसंती' या सिनेमात झळकली होती. या सिनेमात आर. माधवन तिच्या अपोझिट होता. सोहाच्या एकंदर करिअरवर नजर टाकली असता, रंग दे बसंती, आहिस्ता आहिस्ता आणि साहव बीवी और गँगस्टर या सिनेमांनी
बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे. सोहा आत्तापर्यंत सहाहून अधिक सिनेमांमध्ये झळकली आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा सोहा अली खानची निवडक छायाचित्रे...