आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actress Sonakshi Sinha Slams On KRK\'s Tweet

KRKच्या टि्वटनंतर सोनाक्षीचा संताप, म्हणाली, \'त्याला उलटे लटकावून चार थोबाडीत मारायला हव्यात\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सोनाक्षी सिन्हा आणि कमाल राशिद खान)
मुंबई: आपल्या वादग्रस्त टि्वट आणि वक्तव्याने सतत चर्चेत राहणारा अभिनेता कमाल राशिद खानने पुन्हा एकदा नवीन वादाला तोंडर फोडले आहे. सोशल नेटवर्किंग साइड बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा, सोनाक्षी सिन्हा आणि कतरिना कैफविषयी आपत्तीजनक विधान केले आहे.
कमाल आर खान (केआरके)ने टि्वट केले, की खूपच हताश करणारी गोष्ट आहे, की हॉलिवूड अभिनेत्री किम कर्दाशिअनसारखे बॉलिवूड अभिनेत्रींजवळ बट्स नाहीये. त्यानंतर केआरकेने अभिनेत्री दीपिका पदुकोणविषयी टि्वट केले, "Pls RT this if you think that @deepikapadukone has biggest butt in Bollywood." केआरकेने असेच टि्वट सोनाक्षी सिन्हा आणि परिणीती चोपाविषयीसुध्दा केले.
सोनाक्षी सिन्हाने केआरकेच्या टि्वटला प्रत्युत्तर देण्यासाठी त्याच्याप्रमाणे भाषा वापरून लिहिले, 'कमाल आर खान स्त्रियांचा आदर करत नाही. त्याला उलटे लटकावून चार कानशिलात लावल्या पाहिजेत.'
त्यानंतर केआरकेने लिहिले, की सोनाक्षी सिन्हा तुला जर हे अपमानास्पद वाटले असेल मी माफी मागतो. परंतु हा बॉलिवूडच्या सर्वात सेक्सी अभिनेत्रीची निवड करणारा एक सर्व्हे आहे. केआरकेने पुढे लिहिले, की जर तुला हे अपमानास्पद वाटत असेल, तर मी तुला या स्पर्धेतून बाहेर ठेवतो. मात्र सोनाक्षीने केलेल्या टि्वटनंतर केआरकेने माफी मागून सोनाक्षीविषयीची पोस्ट डिलीट केली. एवढेच नव्हे केआरकेने इलियाना आणि बॉलिवूड सुनिधी चौहाणविषयीसुध्दा वादग्रस्त टि्वट केले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा सोनाक्षी सिन्हा आणि कमाल राशिद खानचे टि्वटरयुध्द...