आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actress Sridevi In Paithani Cluster Event In Yevala

PIX : रॅम्पवर पैठणी परिधान करून श्रीदेवी अवतरते तेव्हा...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो सौजन्य : राकेश गिरासे आणि नरेंद्र बटाव)
(वरील फोटो - रॅम्पवर पैठणी परिधान करुन अवतरलेली श्रीदेवी)
येवला : श्रीदेवी पैठणीच्या फॅशन शोनिमित्त झी मराठीच्या कलाकारांसमवेत रँपवर अवतरली तेव्हा सर्वांचेच डोळे श्रीदेवीवर खिळले होते. सुमारे साडे तीन लाख रुपये किमतीची प्युअर ब्राँकेट या प्रकारातील पैठणी श्रीदेवीने परिधान केली होती. रॅम्पवर श्रीदेवी अवतरली अन् उपस्थितांच्या काळजाचा ठोका क्षणभर चुकला... साडेपाच फूट उंचीची श्रीदेवी नक्षीदार फुलांची मोतीया रंगाची पैठणी नेसून रॅम्पवर अवतरली ती झी मराठी या वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या 'जुळून येती' या मालिकेतील प्राजक्ता माळी, 'जावई विकत घेणे आहे' यातील तन्वी पालव, 'अस्मिता' या मालिकेतील मयुरी वाघ यांच्यासमवेत. त्यामुळे सोहळ्याची रंगत वाढली.

राज्य शासनाचा पर्यटन विभाग पर्यटन विकास महामंडळातर्फे साकारलेल्या येवला ग्रामीण पर्यटन माहिती पैठणी प्रोत्साहन केंद्राच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी प्रसिद्ध सिनेतारका श्रीदेवी यांच्या हस्ते दिमाखात पार पडला. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून साकारलेल्या आठ कोटी 78 लाख रुपयांच्या या केंद्राच्या उद्घाटनावेळी पैठणीची भुरळ खुद्द हवाहवाईलादेखील पडल्याचे दिसून आले. पैठणी परिधान करून रॅम्पवर अवतरलेल्या श्रीदेवीने येवलेकरांना चांगलीच मोहिनी घातली. या वेळी परेट ग्रीन रंगातील कडियल पैठणी परिधान करून श्रीदेवी आपले यजमान प्रसिद्ध दिग्दर्शक बोनी कपूर यांच्यासमवेत आल्या होत्या.
पालकमंत्री भुजबळ यांनी वीणकरांना चांगला मोबदला मिळावा, पर्यटकांना पैठणीची विस्तृत माहिती व्हावी, यासाठी पैठणी प्रोत्साहन माहिती केंद्राची उभारणी आपण पर्यटन खात्यामार्फत केल्याचेही सांगितले. आमदार पंकज भुजबळ, माणिकराव शिंदे, समीर भुजबळ, आमदार जयवंत जाधव, अंबादास बनकर, पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक जगदीश पाटील, सहव्यवस्थापकीय संचालक सतीश सोनी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अिभयंता पी. वाय. देशमुख, नगराध्यक्षा शबानाबानो शेख, विक्रम गायकवाड, शेफाली भुजबळ, विशाखा भुजबळ आदी उपस्थित होते. राजेश जोशी यांनी सूत्रसंचालन केले.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा या कार्यक्रमाची खास क्षणचित्रे....