आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

B'Day: बोल्ड इमेज ठरली उदिताच्या करिअरमधील अडथळा, पाहा PICS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(बॉलिवूड अभिनेत्री उदिता गोस्वामी)
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री उदिता गोस्वामी आपल्या सिनेमांपेक्षा बोल्ड इमेजमुळेच नेहमी चर्चेत राहिली. बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी उदिता आज आपला 30वा वाढदिवस साजरा करत आहे. 2 सप्टेंबर 1984 रोजी डेहराडूनमध्ये उदिताचा जन्म झाला. उदिताची आई नेपाळी वंशाची असून वडील राजस्थानी आहेत. काठमांडूमध्ये उदिताचे बालपण गेले. शिक्षणासाठी ती डेहराडूनमध्ये आली. येथील प्रसिद्ध कँब्रियन हॉल आणि डीएवी पब्लिक स्कूलमध्ये उदिताचे शिक्षण झाले.
पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर उदिता मुंबईत दाखल झाली. सिनेमांमध्ये काम मिळवण्यासाठी तिला बराच संघर्ष करावा लागला. ब-याच संघर्षानंतर तिला पेप्सी आणि टाइटन वॉचच्या कमर्शिअल जाहिरातींमध्ये काम करण्याची संधी मिळाली. 2003मध्ये तिला नशीबाने साथ दिली. यावर्षी तिची एन्ट्री भट्ट कॅम्पमध्ये झाली. भट्ट कॅम्पच्या 'पाप' या सिनेमाद्वारे तिने आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. या सिनेमात जॉन अब्राहम उदिताचा हीरो होता. पहिल्याच सिनेमात बोल्ड सीन्स देऊन उदिता प्रकाशझोतात आली.
2005मध्ये उदिता इमरान हाश्मीसह 'जहर' या सिनेमात झळकली. त्यानंतर 2006मध्ये तिचा 'अक्सर' हा सिनेमा रिलीज झाला. आपल्या या सर्वच सिनेमांमध्ये तिने बोल्ड भूमिका साकारुन भरपूर चर्चा एकवटली. मात्र हीच बोल्ड इमेज उदिताच्या करिअरमधील सर्वात मोठा अडथळा ठरली. कारण तिला एकाच प्रकारच्या भूमिका ऑफर होऊ लागल्या. 'अगर', 'किससे प्यार करूं' आणि 'फॉक्स' हे तिचे सिनेमे कधी रिलीज झाले, याचा थांगपत्ताही प्रेक्षकांना लागला नाही. हिरोईन म्हणून अपयशी ठरु लागल्यामुळे तिने फॅशन इंडस्ट्रीकडे आपला मोर्चा वळवला. 2013 मध्ये दिग्दर्शक मोहित सुरीसह लग्न करुन उदिताने आता सिनेसृष्टीला रामराम ठोकला आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा उदिता गोस्वामीची निवडक छायाचित्रे...