आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vidya Balan Look Changed From Serial 'Hum Paanch'

पूर्वी अशी दिसायची विद्या बालन, 'परिणीता'पासून बदलला Look

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली विद्या बालन आज आपला 37वा वाढदिवस साजरा करत आहे. विद्याचा जन्म 1 जानेवारी 1978ला केरळमध्ये झाला. ती लहानाची-मोठी मुंबईमध्ये झाली. तिला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. यासाठी तिला बराच संघर्ष करावा लागला.
एकेकाळी मल्याळम सिनेमांमध्ये करिअर करण्याचे स्वप्न पाहणा-या विद्याचे एक दोन नव्हे तर तब्बल 12 सिनेमे डबाबंद झाले होते. त्यानंतर विद्याने तामिळ सिनेमांकडे आपला मोर्चा वळवला. काही सिनेमेसुद्धा साइन केले. मात्र सिनेमाचे शूटिंग पूर्ण करुनदेखील तिला नंतर रिप्लेस करण्यात आले. याकाळात ती काही जाहिरातींमध्ये झळकली.
'हम पांच'मध्ये केले कामः
सिनेमांमध्ये करिअर करण्याचे स्वप्न पाहणा-या या तरुणीला वयाच्या 16 व्या वर्षी 'हम पांच' या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली होती. टीव्ही इतिहासातील ही एक गाजलेली मालिका ठरली. जवळजवळ 11 वर्षे ही मालिका चालली. एकता कपूरच्या या शोनंतर अनुराग बसूंनीदेखील विद्याला एक मालिका ऑफर केली होती. मात्र सिनेमांमध्ये काम करण्यासाठी तिने ती नाकारली.
'परिणीता'मुळे मिळाला मोठा ब्रेकः
2005 मध्ये 'परिणीता'ला प्रदीप सरकार यांच्या परिणीतामध्ये मोठी संधी मिळाली. मात्र या सिनेमासाठी तिला सहा महिने ऑडिशन द्याव्या लागल्या होत्या. हा विद्याचा पहिला बॉलिवूड सिनेमा होता. पहिल्याच सिनेमाला मिळालेल्या भरघोस यशानंतर तिने कधीही मागे वळून पाहिले नाही. या सिनेमासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
विद्याचे फिल्मी करिअरः
परिणीता (2005), लगे रहो मुन्नाभाई (2006), गुरु (2007), सलाम-ए-इश्क (2007), हे बेबी (2007), पा (2009), इश्किया (2010), नो वन किल्ड जेसिका (2011), द डर्टी पिक्चर (2011), कहानी (2012), घनचक्कर (2013), शादी के साइड इफेक्ट्स, बॉबी जासूस (2014)।
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा दिवसेंदिवस कसा बदलत गेला विद्याचा लूक...