(महिमा चौधरी)
अभिनेत्री महिमा चौधरीने पहिल्याच सिनेमात यशाची चव चाखली होती. मात्र आज ती अज्ञातवासात जगत आहे. ग्लॅमरस जग सोडून ती आता वैवाहित आयुष्याचा आनंद घेत आहे. महिमा आज तिचा 41वा वाढदिवस साजरा करत आहे.
13 सप्टेंबर 1973 रोजी दर्जलिंग, पश्चिम बंगाल येथे जन्मलेल्या महिमाने शिक्षणासाठी दिल्ली येण्यापूर्वी एक ब्यूटी कॉन्टेस्ट जिंकले होते. 1990च्या दशकात ती काही जाहिरातीतही झळकली होती. त्यामध्ये
आमिर खानसह तिने पेप्सीची जाहिरात केली होती.
1997मध्ये 'परदेस' सिनेमामधून बॉलिवूडमध्ये एंट्री करणा-यापूर्वी ती व्हिडिओ जॉकी होती. त्यावेळी दिग्दर्शक सुभाष घई यांनी तिला पाहिले आणि सिनेमासाठी साइन केले.
परदेस, दिल क्या करे, लज्जा, धडकन, दिल है तुम्हारासारखे सिनेमे तिने केले. त्यानंतर 2006मध्ये तिने लग्न करण्याचा निर्णय घेतला. मुंबईचा आर्किटेक्ट बॉबी मुखर्जीसोबत लग्न करून त्वरीत तिने प्रेग्नेंट असल्याचे घोषित केले. तिचे हे बोल ऐकताच सर्वांना धक्का बसला.
बहूधा अभिनेत्री त्यांच्या प्रेग्नेंसीच्या गोष्टी लपवून गुपचुप लग्नगाठीत अडकतात. त्यासाठी त्या अनेक कारणे देतात, मात्र सत्य काही वेगळेच असते.
बॉलिवूडमध्ये लग्न करण्यापूर्वी प्रेग्नेंट राहिलेल्या अभिनेत्रींची मोठी यादी आहे. त्यामध्ये श्रीदेवीपासून ते कंगणा सेन आणि सारिका हासनसारख्या अभिनेत्री सामील आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या अशाच काही अभिनेत्रींविषयी...