आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ईशाने परिधान केली हुबेहुब जॅकलिनच्या साडीसारखी साडी, पाहा कॉपी कॅट अभिनेत्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पहिल्या छायाचित्रात यलो क्रिम शेडच्या साडीत ईशा गुप्ता. दुस-या छायाचित्रात जॅकलिन फर्नांडिसदेखील याच रंगाच्या साडीत दिसत आहे.)
बॉलिवूड अभिनेत्री अलीकडेच फॅशन डिझायनर अजाच्या नवीन स्टोअर ओपनिंगला पोहोचली होती. या कार्यक्रमात तिने डिझायनर वरुण बहलने डिझाइन केलेली यलो-क्रिम शेडची साडी परिधआन केली होती. यलो कलरच्या पदरावर करण्यात फ्लोरल पॅच वर्कमुळे साडीच्या सौंदर्यात भर पडली होती. थ्री फोर्थ स्लाव्स नेट ब्लाऊजने या साडीला स्टायलिश लूक दिला.
ईशाच्या या साडीची चर्चा होण्यामागचे कारण म्हणजे, काही दिवसांपूर्वी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिय हुबेहुब अशाच साडीत दिसली होती. एका लव्ह डायट नावाच्या बुक लाँच कार्यक्रमात ती या साडीत अवतरली होती.
जॅकलिन आणि ईशाच्या साडीत केवळ बॉर्डरचे अंतर दिसली. ईशाच्या साडीची बॉर्डर क्रिम कलरची होती, तर जॅकलिनच्या साडीत यलो कलरची होती.
तसे पाहता, यापूर्वीदेखील बी टाऊनच्या अनेक अभिनेत्री इतर अभिनेत्रींच्या ड्रेसेसची सर्रास कॉपी करताना दिसल्या आहेत. या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला अभिनेत्रींच्या कॉपी कॅट ड्रेसेसची छायाचित्रे दाखवत आहोत...
पुढे पाहा, बी टाऊनच्या अभिनेत्रींची छायाचित्रे...