आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मु्ंबईत 16 कोटींच्या फ्लॅटमध्ये राहते दीपिका; या अभिनेत्रींची मायानगरीत नाहीत स्वतःची घरे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः दीपिका पदुकोण)
मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने सोमवारी (5 जानेवारी) आपला 29वा वाढदिवस साजरा करत आहे. 2007 मध्ये 'ओम शांति ओम' या सिनेमाद्वारे दीपिकाने आपल्या बॉलिवूड करिअरला सुरुवात केली आणि बघता बघता आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये दीपिकाची गणना होऊ लागली. मागील काही दिवसांत आलेले तिचे सर्व सिनेमे हिट ठरले.
आता दीपिकाकडे केवळ सिनेमांची रिघच लागलेली नाही, तर मायानगरीत तिचा स्वतःचा आशियानादेखील आहे. काही दिवसांपूर्वीच दीपिकाने प्रभादेवी येथे बॉ मॉण्ड टॉवर्समध्ये 2, 776 चौ. फुटांचे 4 BHK अपार्टमेंट खरेदी केले आहे. या अपार्टमेंटची किंमत 16 कोटींच्या घरात आहे. हे अपार्टमेंट खरेदी करण्यापूर्वी दीपिका वांद्र्यातील पाली हिल भागात भाड्याने राहात होती. यशस्वी अभिनेत्री बनल्यानंतर दीपिकाने प्रॉपर्टीत गुंतवणूक केली आहे. काही महिन्यांपूर्वी ती अमिताभ बच्चन यांच्या घराशेजारी नवीन घर शोधत होती.
तसे पाहता, दीपिकासोबतच अनुष्का शर्माकडेही मुंबईत स्वतःचे घर आहे. मात्र येथे अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या आजही मुंबईत भाड्याने राहतात.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या कोणकोणत्या अभिनेत्री भाड्याने राहतात...