आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनु, ऐश्वर्यापासून ते करीनापर्यंत, या अभिनेत्रींच्या चेह-यात पडला एवढा फरक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूडमध्ये जेव्हा एखादी अभिनेत्री आपल्या करिअरला सुरुवात करते, तेव्हा ती आपल्या सौंदर्य आणि अभिनयाच्या बळावर यशाचा मार्ग शोधून काढत असते. काळानुसार काही अभिनेत्रींच्या सौंदर्यात भर पडते, तर काही अभिनेत्रींच्या चेह-याच आलेल्या बदलांमुळे त्यांना ओळखणेसुद्धा कठीण होते. तारुण्यात या अभिनेत्री आपल्या सौंदर्याने प्रेक्षकांवर भूरळ घालतात, तर म्हातारपणी त्यांना ओळखणे कठीण होते.
1990 मध्ये महेश भट्ट यांच्या 'आशिकी' या सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात करणारी अभिनेत्री अनू अग्रवाल दीर्घकाळापासून गायब होती. मात्र अलीकडेच तिला मुंबईतील एनसीपीए (नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्स) मध्ये बघितले गेले. एनसीपीएमध्ये आयोजित या इवेंटमध्ये अनु येथील अधिका-यांसोबत दिसली. यावेळी अनुचा चेहरा पूर्वीच्या तुलनेत बराच बदललेला दिसला. यावेळी तिला ओळखणेसुद्धा कठीण झाले होते.
अनुने आपल्या फिल्मी करिअरमध्ये डझनहून अधिक सिनेमांमध्ये काम केले. नव्वदच्या दशकात अनुला बघून प्रेक्षक तिचे चाहते झाले होते. मात्र आता तिच्याकडे बघून हीच प्रसिद्ध अभिनेत्री अनु अग्रवाल आहे, यावर कुणाचा विश्वास बसणार नाही.
तसं पाहता अनु बॉलिवूडमधील एकमेव अभिनेत्री नाहीये, जिच्या चेह-यात वयानुसार बदल घडला, तर ऐश्वर्या, करीना, प्रियांकासह अनेक अभिनेत्री अशा आहेत, ज्यांच्या चेह-यात वयानुसार बदल घडला आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा कोणकोणत्या अभिनेत्रींचा चेहरा वयानुसार बदलत गेला...