(फाइल फोटोः किरण राव आणि विद्या बालन)
मुंबईः
आमिर खानची पत्नी किरण रावने फिल्म इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. निर्माती, दिग्दर्शिका आणि लेखिका असलेली किरण एक अभिनेत्रीसुद्धा आहे. आमिरसोबत लग्न झाल्यानंतर तिच्या लोकप्रियतेत आणखी भर पडली. 7 नोव्हेंबर रोजी करिण वयाची 41 वर्षे पूर्ण करणार आहे.
7 नोव्हेंबर 1973 रोजी बंगळूरुमध्ये किरणचा जन्म झाला. मात्र कोलकातामध्ये ती लहानाची मोठी झाली. मास कम्युनिकेशनची पदवी प्राप्त केल्यानंतर किरणने 'लगान' या सिनेमाद्वारे सहायक दिग्दर्शिका म्हणून करिअरला सुरुवात केली. आशुतोष गोवारिकर दिग्दर्शित आणि आमिर खानची प्रमुख भूमिका या सिनेमात होती. या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यानच आमिर आणि किरण यांच्यात सूत जुळले.
यापूर्वी किरण आमिर खान स्टारर 'दिल चाहता है' या सिनेमात एका छोट्या भूमिकेत झळकली आहे. 2001 मध्ये लगानच्या सेटवर सुरु झालेल्या आमिर-किरणच्या लव्ह स्टोरीचे 2005 मध्ये लग्नात रुपांतर झाले. किरणसोबत लग्नगाठीत अडकण्यापूर्वी म्हणजे 2002मध्ये आमिरने पहिली पत्नी रीना दत्तपासून घटस्फोट घेतला होता. किरण आमिरची दुसरी पत्नी आहे. या दाम्पत्याला एक मुलगा असून त्याचे नाव आझाद राव खान आहे. किरणप्रमाणेच बी टाऊनमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी दुसरी आणि तिसरी पत्नी होणे सहज स्वीकारले.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला बी टाऊनमधील अशाच काही अभिनेत्रींविषयी सांगतोय, ज्यांनी विवाहित पुरुषांची निवड आपल्या जोडीदाराच्या रुपात केली...
कोण आहेत या अभिनेत्री जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...