आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐश्वर्या, शिल्पा, करीना, असा होता या बॉलिवूड अभिनेत्रींचा Wedding Look

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो - ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन)
लवकरच अभिनेत्री दीया मिर्झा बोहल्यावर चढणार आहे. यावर्षी 18 ऑक्टोबरला दीया बिझनेसमन साहिल संघासह बोहल्यावर चढणार आहे. स्वतः दीयाने ही गोड बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे. दिल्लीत त्यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे. आपल्या लग्नात दीया कोणता पोशाष परिधान करणार, याची उत्सुकता आहे. फॅन्स आणि मीडियामध्ये जेवढी चर्चा ही सेलिब्रिटींच्या लग्नाची असते, तेवढीच चर्चा ही त्यांच्या पोशांखाविषयीसुद्धा रंगते.
मॉडेल आणि अभिनेत्री दीयाने अनेक सिनेमे आणि फॅशन शोजमध्ये वेडिंग ड्रेस परिधान केले आहेत. मात्र स्वतःच्या लग्नात ती कोणत्या डिझायनरचा ड्रेस घालणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मनीष मल्होत्रापासून ते अनीता डोंगरा आणि रॉकी एसपर्यंतच्या आघाडीच्या डिझायनर्सचे ड्रेस आजवर दीयाने परिधान केले आहेत. आता यापैकी कोण दीयाचा वेडिंग डे स्पेशल करणार हे लवकरच कळेल.
तसे पाहता रितु कुमार, नीता लुल्ला, तरुण ताहिलानी या प्रसिद्ध डिझायनर्सनी यापूर्वी बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींसाठी वेडिंग ड्रेस डिझाइन केले आहेत. यामध्ये ऐश्वर्या राय बच्चन, शिल्पा शेट्टी यांसारख्या अभिनेत्रींच्या नावाचा समावेश आहे.
पिवळ्या रंगाची कांजीवरम साडी...
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचे लग्न बॉलिवूडमधील सर्वाधित चर्चित लग्न आहे. नववधूच्या रुपात ऐश्वर्याने पिवळ्या रंगाची कांजीवरम साडी परिधान केली होती. नीता लुल्ला यांनी तिच्यासाठी ही साडी डिझाइन केली होती. यासोबत ऐश्वर्याने 22 कॅरेटचे सोन्याचे दागिने घातले होते.
पुढे वाचा, अभिनेत्रींनी आपल्या लग्नाच्या दिवशी कसा ड्रेस परिधान केला होता...