आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेनेलिया, ऐश्वर्या, लारा, शिल्पा, प्रेग्नेंसीत या अभिनेत्रींचा दिसला स्टायलिश LOOK

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(रितेश देशमुखच्या 'लय भारी' या सिनेमाच्या म्युझिक लाँचवेळी जेनेलिया देशमुख)
बॉलिवूड अभिनेत्री जेनेलिया डिसुजा-देशमुखकडे गोड बातमी असून लवकरच देशमुखांच्या घरी पाळणा हलणार आहे. अलीकडेच ती आपल्या काही नातेवाईकांना सोडायला एअरपोर्टवर पोहोचली होती. यावेळी तिचे बेबी बम्प स्पष्ट दिसत होते. प्रेग्नेंट असल्यापासून जेनेलिया वेगवेगळ्या कार्यक्रमांना उपस्थिती लावताना दिसत आहे. पती रितेश देशमुखच्या 'एक व्हिलन' या सिनेमाचा प्रीमिअर असो किंवा 'लय भारी' या मराठी सिनेमाचे स्क्रिनिंग, जेनेलिया आवर्जुन या कार्यक्रमांना हजर राहिली.
खरं तर प्रेग्नेंसीच्या काळात बॉलिवूड अभिनेत्री सार्वजनिक ठिकाणी हजेरी लावणे सहसा टाळताना दिसतात. एखाद दुस-या कार्यक्रमांमध्येच त्यांची झलक दिसते.
बॉलिवूडच्या उलट हॉलिवूडमध्ये हे खूप कॉमन आहे. तेथील अभिनेत्री प्रेग्नेंसीच्या काळात बिनधास्तपणे फिरताना दिसतात. अनेकजणी तर या अवस्थेत खास फोटोशूटसुद्धा करुन घेतात. अद्याप बॉलिवूडमध्ये मात्र हा ट्रेंड आलेला दिसत नाही. ऐश्वर्या राय बच्चनने प्रेग्नेंसीच्या काळात फार पब्लिक अपिअरन्स दिला नव्हता. याशिवाय तिने तिची लेक आराध्यालासुद्धा बरेच दिवस मीडियापासून लांब ठेवले होते. याउलट लारा दत्ता, शिल्पा शेट्टी यांनी आपल्या मुलांना कधीच मीडियापासून दूर ठेवले नाही.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा प्रेग्नेंसीच्या काळात बॉलिवूड अभिनेत्री कशा दिसत होत्या...