आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुणाचे 4 तर कुणाचे होते 6 बॉयफ्रेंड, कधीच सिंगल नव्हत्या या 6 अभिनेत्री

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडची ग्लॅमरस हॉरर गर्ल म्हणून ओळखली जाणारी बिपाशा बसु आज (7 जानेवारी) आपला 36वा वाढदिवस साजरा करत आहे. ती सध्या 16 जानेवारी रोजी रिलीज होणा-या 'अलोन' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. बिपाशा सिनेमातील बोल्ड सीन्सने बरीच चर्चेत आली आहे. हा तिचा 7वा हॉरर सिनेमा आहे.
सिनेमासोबतच बिपाशा आपल्या अफेअरमुळे चर्चेत राहिलेली आहे. काही दिवसांपासून तिचे नाव 'अलोन'चा को-स्टार करण सिंह ग्रोवरसोबत जुळले आहे. या बातम्यांमध्ये थोडीफार सत्यता वाटते, कारण बिपाशाचे हरमन बावेजासोबत ब्रेक-अप झाले आहे. तसेच, करणसुध्दा आपली पत्नी अभिनेत्री जेनिफपासून विभक्त झाला आहे. त्यामुळे दोघांची जवळीक पाहून अशा बातम्या समोर येत आहेत.
ज्या अभिनेत्री कधीच सिंगल राहिल्या नाहीत अशा अभिनेत्रींमध्ये बिपाशाचे नाव सामील होते. इंडस्ट्रीमध्ये आल्यापासून तिचे स्टेट्स कधीच सिंगल राहिले नाही.
आतापर्यंत यांच्यासोबत जुळले बिपाशाचे नाव-
बिपाशा बसू

फिल्म इंडस्ट्रीमध्ये 'बिल्लो राणी' नावाने ओळखली जाणारी ही बंगाली बालासुध्दा अशा अभिनेत्रींच्या यादीत आहे, ज्या कधीच सिंगल राहिल्या नाहीत. सध्या तिच्या करिअरमध्ये तिला काही खास यश मिळत नाहीये. परंतु एकेकाळी बिपाशाने अनेक सुपरहिट सिनेमे देऊन लोकांची पहिली पसंत बनली होती.

बिपाशादेखील 'सीरिअल डेटर' मानले जाते. सर्वात पहिले तिचे नाव डिनो मोरिआसोबत जोडले होते. डिनोसोबत तिच्या दिर्घकाळ अफेअरनंतर त्यांचे ब्रेकअप झाले. डिनोसोबत ब्रेकअप होताच तिच्या आयुष्यात जॉन आब्राहमने एंट्री घेतली. सध्याच्या आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये जॉनचाही सामावेश होतो. बिपाशा आणि जॉनचे अफेअर जवळपास 10 वर्षे होते. यांचे ब्रेकअप 2012मध्ये झाले. ब्रेकअप होण्यापूर्वी अशाही बातम्या आल्या होत्या, की या दोघांनी गुपचुप लग्न केले. परंतु त्यांच्या ब्रेकअपने सर्वांना धक्का बसला. बिपाशाचे आर. माधवनसोबतसुध्दा नाव जुळले होते. त्यानंतर हरमन बावेजासुध्दा काही वर्षे तिच्या आयुष्यात राहिला. सध्या दोघांचे ब्रेकअप झाल्याचे बोलले जात आहे.
बिपिशाच्या वाढदिवसानिमित्त, या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत बॉलिवूडच्या अशा काही अभिनेत्रींविषयी ज्या नेहमीच होत्या कुणाच्या ना कुणाच्या अफेअरमध्ये कधीही त्यांच्यावर सिंगल नावाचा शिक्का लागला नाही. पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या कोण आहेत त्या अभिनेत्री...