(फोटो - करिश्मा कपूर पूर्वी आणि आत्ता )
बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर सध्या आपल्या वैवाहिक आयुष्यात आलेल्या चढउतारांमुळे चर्चेत आले. 25 जून रोजी वयाची 40 वर्षे पूर्ण करणारी करिश्मा कपूर घराण्यातील पहिली मुलगी आहे, जिने सिनेसृष्टीत पदार्पण केले. यासाठी तिला तिच्या आईचा भक्कम पाठिंबा मिळाला होता. घराण्याची परंपरा तोडत करिश्मा केवळ अभिनेत्रीच बनली नाही तर यशस्वीसुद्धा ठरली. नव्वदच्या दशकात करिश्मा बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक होती.
लूकमुळे उपस्थित झाले होते प्रश्न...
फिल्मी करिअरमध्ये करिश्मा अजय देवगणसोबतच्या अफेअरच्या बातम्यांमुळे विशेष चर्चेत राहिली. याशिवाय तिचा लूकसुद्धा नेहमी चर्चेचा विषय ठरला. वयाच्या 17 व्या वर्षी 1991मध्ये 'प्रेम कैदी' या सिनेमाद्वारे फिल्मी करिअरला सुरुवात करणा-या करिश्माचा लूक अगदीच सामान्य होता. कुरळे केस आणि मोठे आयब्रो असलेली करिश्मा फॅशनपासून लांब एक सामान्य मुलगी होती. मात्र जसजसे बॉलिवूडमध्ये तिचे करिअर पुढे सरकले, तसतसा तिच्या लूकमध्ये आमुलाग्र बदल पाहायला मिळाला.
'राजा हिंदुस्थानी' या सिनेमापूर्वी करिश्माने फेस लिफ्ट आणि नाकाची सर्जरी करुन घेतली होती, असे म्हटले जाते. फेस लिफ्ट सर्जरीच्या माध्यमातून चेह-याला आकार आणि सुरकुत्या दूर केल्या जातात. तर नाकाच्या सर्जरीमध्ये नाक छोटे, मोठे, पातळ केले जाते.
करिश्माने मात्र कधीही सर्जरी करुन घेतल्याचे स्वीकारले नाही. मात्र तिची जुनी आणि आत्ताची छायाचित्र पाहिली असता, तिच्यात झालेला बदल स्पष्ट दिसून येतो.
बॉलिवूडमध्ये सुंदर दिसण्यासाठी सर्जरीची मदत घेतलेल्या अनेक अभिनेत्री आहेत. विशेष म्हणजे आजवर यापैकी कोणत्याही अभिनेत्रीने सर्जरी करुन घेतल्याचे मान्य केलेले नाही.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या चेह-याचा कायापालट करुन घेतलेल्या बी टाऊनमधील अभिनेत्रींविषयी...