आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SIIMA 2014: रेड कार्पेटवर श्रीदेवी, नितू, असिनने काढले सेल्फी, पाहा Pics

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(श्रीदेवी आणि तमन्ना भाटिया)
मुंबई: साउथ इंडियन इंटरनॅशनल मूव्ही अवॉर्ड्स (SIIMA)चे आयोजन मलेशियाच्या कुआलालंपूरमध्ये करण्यात आले. या इव्हेंटचा आज (14 सप्टेंबर) दुसरा दिवस आहे. यावेळी तमिळ, तेलगू आणि मल्याळम इंडस्ट्रीमधून अनेक स्टार्सनी हजेरी लावली होती.
अभिनेत्री श्रीदेवी दुस-या दिवशीसुध्दा पती बोनी कपूरसह या इव्हेंटमध्ये पोहोचली होती. शिवाय श्रेया सरन, असिन, अमाला पॉलसुध्दा या समारंभात दिसले. अभिनेत्री हुमा कुरेशी भाऊ साकिबसह पोहोचली होती. इव्हेंटमध्ये असिन तिच्या चाहत्यांसह सेल्फी काढताना दिसली.
SIIMAचे चेअरमन विष्णु इंदौरी यांनी सांगितले, 'भारतीय सिनेमे मलेशियात खूप लोकप्रिय आहेत त्यामुळे अवॉर्ड सेरेमनीसाठी मलेशियाची निवड करण्यात आली.' या अवॉर्ड फंक्शनचा समारोपही येथेच होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा SIIMAमध्ये सामील झालेल्या सेलेब्सची छायाचित्रे...