आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood And Tv Actresses Support To Deepika Padukone

\'क्लिवेज\'च्या बातमीने दीपिका संतापली, प्रियांका, हुमासह अभिनेत्रींनी दर्शवला पाठिंबा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा)
मुंबईः बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोणने तिच्या क्लीवेजसंबंधातील बातमीला जोरदार विरोध केल्यानंतर तिला बॉलिवूड अभिनेत्रींचा पाठिंबा मिळाला आहे. प्रियांका चोप्रा, हुमा कुरेशी, इलियाना डिक्रूज, दीया मिर्झा, निम्रत कौर, फराह खान, सोफी चौधरी, किर्ती सेनन, अदिती राव हैदरी आणि ईशा गुप्ता या अभिनेत्रींनी दीपिकाने उचललेल्या पावलाचे कौतुक केले आहे.
प्रियांकाने ट्विटरवर लिहिले, ''खूप छान दीपिका, आमच्या सर्वांसाठी स्टॅण्ड घेतल्याबद्दल.'' तर हुमा कुरेशी म्हणाली, ''मी दीपिकासोबत आहे... त्यांचे (मीडिया) तोंड बंद करण्याचा हाच योग्य मार्ग आहे.'' तर टीव्ही अभिनेत्री आणि डान्सर सोफी चौधरीने दीपिकाने घेतलेल्या स्टॅण्डला एक नवीन लॉ असल्याचे म्हटले. तिने लिहिले, "मीडिया नेहमीच सेलिब्रिटींच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफवर हल्ला चढवत असतो. मात्र आता हा एक नवीन कायदा आहे. सडेतोड उत्तर देण्यासाठी धन्यवाद दीपिका."
काय आहे प्रकरण?
अलीकडेच एका इंग्रजी वृत्तपत्राने एका व्हिडिओमध्ये गाऊनमध्ये असलेल्या दीपिकाचे स्तन आणि त्यातील 'क्लीवेज' दाखवले. दीपिकाने जेव्हा ही बातमी पाहिली तेव्हा तिचा पार चढला आणि ती रागाने लाल झाली. ती म्हणाली होती, 'देशातील प्रमुख वृत्तपत्राने हे वृत्त प्रकाशित केले आहे. ही बातमी आहे का? होय, मी एक महिला आहे आणि माझ्याकडे स्तन आणि क्लिवेज आहे. यात तुम्हाला काही अडचण आहे का? जर तुम्हाला महिलांचा सन्मान करता येत नसेल तर महिला सशक्तीकरणाचा गप्पा मारू नका.'

पुढील स्लाईड्समध्ये पाहा दीपिकाच्या समर्थनार्थ बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेत्रींचे ट्विट्स...