आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंगनाच्या बर्थ डे बॅशमध्ये बिग बी, आमिरसह पोहोचले सेलेब्स, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूडची 'क्वीन' अर्थातच अभिनेत्री कंगना राणावतने रविवारी आपला वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने कंगनाने आपल्या राहत्या घरी एक जंगी पार्टी आयोजित केली होती. यावेळी कंगनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी बॉलिवूडमधील अनेक दिग्गज मंडळी पार्टीत सहभागी झाली होती. महानायक अमिताभ बच्चन आणि आमिर खान यांनी कंगनाच्या पार्टीला चारचाँद लावले.
अलीकडेच कंगनाचा 'क्वीन' हा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमातील तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. पार्टीतही कंगनाचे खूप कौतुक झाले.
सुत्रांच्या मते, अमिताभ बच्चन 'क्वीन'मधील कंगनाचा अभिनय पाहून तिच्यावर इम्प्रेस झाले आहेत. पार्टीतही बिग बींनी कंगनाचे तोंडभरुन कौतुक केले.
कोणकोण पोहोचले होते कंगनाच्या पार्टीत...
अमिताभ बच्चन आणि आमिर खान यांच्याशिवाय कंगनाच्या पार्टीत विवेक ओबरॉय त्याची पत्नी प्रियांकासह पोहोचला होता. तर किरण राव, जया बच्चन, रितेश देशमुख, जेनेलिया देशमुख, शबाना आझमी, जावेद अख्तर, राजकुमार राव, पिंकी रोशन, राकेश रोशन, अनुराग कश्यप, विशाल भारद्वाज, अनुपमा चोप्रा, विधु विनोद चोप्रा आणि अनुपम खेर यांनीही कंगना बर्थ डे विश केले.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा पार्टीत पोहोचलेल्या सेलेब्सची खास छायाचित्रे...