मुंबईः सोमवारी कंगना रनोट आणि प्रियांका चोप्रा यांनी एकत्रितरित्या नॅशनल अवॉर्ड मिळाल्याचा आनंद साजरा केला. एक जंगी पार्टी आयोजित करुन फिल्म इंडस्ट्रीतील जवळल्या मित्रमैत्रिणींसोबत दोघींनी हा आनंद शेअर केला. या पार्टीत
आमिर खान, श्रद्धा कपूर, विद्या बालन यांच्यासह अनेक सेलेब्स सहभागी झाले होते. रविवारी दिल्लीत पार पडलेल्या नॅशनल अवॉर्ड्स सोहळ्यात 'क्वीन' सिनेमातील भूमिकेसाठी कंगनाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा नॅशनल अवॉर्ड मिळाला, तर प्रियांका चोप्राच्या 'मेरीकोम' या सिनेमाला बेस्ट पॉप्युलर फिल्मच्या अवॉर्डने सन्मानित करण्यात आले.
ही पार्टी कंगना रनोटने होस्ट केली होती, तर प्रियांका गेस्ट म्हणून पार्टीत पोहोचली होती. उशीरा रात्री पावणे बाराच्या सुमारास प्रियांका या पार्टीत पोहोचली.
या सक्सेस बॅशमध्ये विद्या बालन पती सिद्धार्थ रॉय कपूर यांच्यासोबत दिसली. इमरान खान, अवंतिका मलिका, फराह खान, शिरीष कुंदर, अनुपम खेर,
सोनू सूद, दर्शन कुमार, दिग्दर्शिका झोया अख्तरसह बरेच सेलेब्स पार्टी एन्जॉय करताना दिसले. या पार्टीत दीपिका पदुकोण मात्र गैरहजर दिसली.
एका जवळच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, दीपिकाला या पार्टीत आमंत्रित न करणे ही अचंबित करणारी गोष्ट होती. आता कंगनाने दीपिकाला का इनवाइट केले नाही, हे तर तिचे तिलाच ठाऊक.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, पार्टीत पोहोचलेल्या स्टार्सची छायाचित्रे...