आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • These 15 Wedding Are Most Memorable In Bollywood

डोळे दिपवणारे असतात बॉलिवूडमधील लग्नसोहळे, हे आहेत BIG FAT WEDDINGS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडून उजवीकडेः आईवडिलांसोबत अहाना देओल, दीया मिर्झा-साहिल संघा, करीना-सैफ)
मुंबई- बॉलिवूड अभिनेता सलमान खानची बहीण अर्पिता हिचा आज शाही लग्नसोहळा हैदराबादमध्ये होतोय. दिल्लीस्थित आयुष शर्मासोबत अर्पिता लग्नगाठीत अडकत आहे. अर्पिताचा लग्नसोहळा शाही ठरवा, यासाठी खान कुटुंबीयांनी जय्यत तयारी केली आहे. लग्नानंतर 21 नोव्हेंबर रोजी मुंबईत ग्रॅण्ड रिसेप्शन पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. याचवर्षी अभिनेत्री दीया मिर्झा हिचेही लग्न झाले. दिल्लीतील आर्यसमाजमध्ये दीया बॉयफ्रेंड आणि बिझनेस पार्टनर साहिल संघासोबत लग्नगाठीत अडकली.
बॉलिवूडमधील लग्नसोहळ्यांविषयी बोलायचे झाल्यास, सेलिब्रिटी आपल्या आयुष्यातील हा
खास दिवस स्पेशल बनवण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करतात. कपडे, लग्नस्थ, सजावट, दागदागिने, व्यंजन याकडे सेलिब्रिटी विशेष लक्ष देतात. डोळे दिपवणारे हे लग्नसोहळे त्यांच्या चाहत्यांच्या कायम स्मरणात राहतात.
सेलिब्रिटींच्या लग्नात अनेक मान्यवर मंडळी आवर्जुन हजेरी लावत असतात. बॉलिवूडच नव्हे तर बिझनेस आणि राजकीय वर्तुळातील दिग्गज या लग्नसोहळ्यांना हजेरी लावताना दिसतात. शिल्पा शेट्टी, अभिषेक बच्चन, रितेश देशमुख, विद्या बालन, ईशा देओल, अहाना देओल, करीना कपूर, इमरान खान, विवेक ओबरॉय, हृतिक रोशन, जाएद खान, करीश्मा कपूर, अमृता अरोरा या सेलिब्रिटींच्या लग्नाचा थाट शाही होता.
2000 पासूनच्या बॉलिवूडमधील याच भव्यदिव्य लग्नसोहळ्यांविषयी आम्ही तुम्हाला या पॅकेजमध्ये सांगत आहोत...
छायाचित्रांमध्ये पाहा बॉलिवूडमधील बिग फॅट वेडिंग...