आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TOP 21: हे आहेत बॉलिवूड सिनेमांचे सर्वात बोल्ड आणि कॉन्ट्रोव्हर्शिअल पोस्टर्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - येत्या शुक्रवारी म्हणजेच 9 मे रोजी सिल्व्हर स्क्रिनवर 'मस्तराम' हा सिनेमा रिलीज होतोय. या सिनेमात ताशा बेरी मेन लीडमध्ये झळकणार आहे. ताशा यापूर्वी 'गँग्ज ऑफ वासेपूर' या सिनेमात झळकली होती. अखिलेश जैस्वाल या सिनेमाचे दिग्दर्शक असून हा त्यांचा पहिलाच सिनेमा आहे. या सिनेमाद्वारे कपिल दुबे आणि राहुल बग्गा बॉलिवूडमध्ये आपल्या करिअरला सुरुवात करत आहेत.
या सिनेमाची कथा काय आहे, हे तर सिनेमा रिलीज झाल्यानंतरच कळेल. मात्र या सिनेमाचे पोस्टर्स बरेच बोल्ड दिसत आहेत. तसे पाहता प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी निर्माते-दिग्दर्शक फार पूर्वीपासून बोल्ड पोस्टर्सची मदत घेत असल्याचे दिसून येते. त्यामुळे अनेकदा वादांनाही तोंड फुटले आहे.
‘3 जी’, ‘हेट स्टोरी’, ‘द डर्टी पिक्चर’, ‘जोड़ी ब्रेकर्स’, ‘जिस्म 2’, ‘मर्डर 2’, ‘साहिब बीवी और गैंगस्टर’, ‘काइट्स’, ‘राज’, ‘कुर्बान’, ‘आशिक बनाया आपने’, ‘ब्लड मनी’, ‘द डर्टी बॉलिवबड बॅचलर’, ‘हैलो...कौन है’, ‘हीरोइन’, ‘हिस्स’, ‘इंकार’, ‘जूली’, ‘मरेगा साला’, ‘रागिनी MMS 2’, ‘मर्डर 3’, ‘नशा’, ‘निशब्द’, ‘प्लेयर्स’, ‘प्यार के साइड इफेक्ट्स’, ‘राज 3’, ‘रेड’, ‘कौन है वहां’ यांसारख्या सिनेमांचे पोस्टर्स बरेच बोल्ड बनवण्यात आले होते. काही सिनेमांचा अपवाद वगळता बोल्ड पोस्टर्स सिनेमा हिट करण्यात अयशस्वी ठरले होते.
खरं तर पूर्वीच्या काळी ए ग्रेड सिनेमांचे पोस्टर्स बोल्ड असायचे. मात्र आता बॉलिवूडमधील सामान्य सिनेमांचेही पोस्टर्स बोल्ड दिसू लागले आहेत. या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला अशाच काही बोल्ड पोस्टर असलेल्या सिनेमांविषयी सांगत आहोत.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या या बोल्ड पोस्टर्स असलेल्या सिनेमांविषयी..