आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेटा ऐश्वर्या, आमिर, शाहरुखच्या मुलांना, जाणून घ्या त्यांच्या नावांचा अर्थ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- मुलगी आराध्यासोबत ऐश्वर्या राय बच्चन आणि मुलगा आझादसोबत आमिर खान)
मुंबईः शुक्रवारी अर्थातच 14 नोव्हेंबर रोजी बालदिन आहे. हा दिवस बॉलिवूड सेलिब्रिटींची मुलेसुद्धा साजरा करतील. अभिषेक-ऐश्वर्याची लेक आराध्या असो, आमिर-किरणचा मुलगा आझाद असो, किंवा शाहरुखची मुले, प्रत्येक स्टार किड्ससाठी हा दिवस खास असतो.
बी टाऊन सेलिब्रिटींच्या नावाचा अर्थसुद्धा खूप खास आहे. खरं तर नावात काय आहे? असे शेक्सपिअरने म्हटले आहे. व्यक्तीची खरी ओळख त्याच्या कामाने होते. शेक्सपिअरचे म्हणणे खरे आहे. मात्र आपल्या मुलांची नावे इतरांपेक्षा वेगळी असावी, असे प्रत्येक पालकाला वाटत असते. बॉलिवूड स्टार्सनी आपल्या मुलांची नावे खूप विचारपूर्वक ठेवली आहेत. आराध्या, नितारा, आझाद, अबराम, शाहरान, सायरा, वियान ही बी टाऊनच्या अभिनेत्यांच्या मुलांची नावे आहेत. या प्रत्येक नावाचा काही तरी अर्थ आहे. उदाहणार्थ, आराध्याचा अर्थ पूजा हा होतो.
बालदिनाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला बी टाऊनच्या सेलिब्रिटींच्या मुलांची भेट करुन देत आहोत. सोबतच त्यांच्या नावांचा अर्थदेखील सांगत आहोत.
नाव - आराध्या
पालक - अभिषेक-ऐश्वर्या राय बच्चन
अर्थ - आराध्याचा अर्थ पूजा असा होतो. जो पूजेस पात्र असतो, त्याला संस्कृतमध्ये आराध्या असे म्हणतात.

पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या बी टाऊन स्टार्सच्या लाडक्या मुलांच्या नावाचा अर्थ...