आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गर्लफ्रेंड प्रियासह लग्न करायला संजय तयार, आता फक्त करिश्माकडून घटस्फोटाची प्रतिक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- संजय कपूरसोबत करिश्मा कपूर, प्रिया सचदेव)
बॉलिवूड आणि एक्स्ट्रामॅरिटल अफेअरचं नातं जुनं आहे. गुरुदत्तपासून अनुराग कश्यपपर्यंत सगळ्यांची गोष्ट सारखीच, फक्त पात्र बदलली आहेत. यावेळी करिश्मा आणि संजय कपूर यांच्यात प्रिया सचदेववरून पेच निर्माण झाला आहे.
दिल्लीचं हाय सोसायटी सर्कल, पेज थ्री पार्टीज् आणि गोल्फच्या मैदानात संजय कपूर आणि प्रिया सचदेव (चटवाल) अनेकदा एकत्र दिसत आहेत. उद्योगपती संजय कपूर अभिनेत्री करिश्मा कपूरचा पती आहे, ज्याच्याशी करिश्माचं 2003 साली लग्न झालं होतं.
करिश्माने 2005 साली मुलगी समायरा आणि 2010 साली मुलगा कियान राज कपूर याला जन्म दिला. परंतू त्यातल्या त्यात ती चार वेळा दिल्लीहून मुंबईला आली होती. कधी प्रकरण कोर्टात गेलं तर कधी सामंजस्याने तोडगा काढून जोडण्यात आले. 2011 साली रणधीर कपूर यांनी सांगितलं होतं की त्यांची मुलगी घटस्फोट घेणार नाही, परंतू त्याच वेळी संजयच्या आयुष्यात प्रियाची खास जागा निर्माण झाली.
प्रिया ही त्यावेळेला तिचा पती विक्रम चटवालशी काडीमोड घेण्याच्या तयारीत होती. आता प्रिया आणि संजय सोबत आहेत. प्रियाचा घटस्फोट झालेला आहे आणि संजयही लवकरच आपल्या नात्यातून मुक्त होणार आहे. आपली प्रॉपर्टी वाचवण्याकरता संजयने मुलांची कस्टडी स्वतःकडे ठेवण्यासाठी करिश्मावर केस केली आहे. सुत्रांनूसार प्रिया आणि संजय लवकरच लग्न करतील.
बॉलिवूडमध्ये अनेक नात्यांची अशीच गोष्ट आहे, ज्यात कितीतरी स्टार्सचे आयुष्य कोणीतरी तिसरा आल्यामुळे उध्वस्त झाले. जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढच्या स्लाईड्सवर...