आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Celebrities At Special Screening 'O Teri'

PICS: 'ओ तेरी'च्या स्क्रिनिंगला संगीता, एलीसह पोहोचले अनेक सेलेब्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईमध्ये काल (27 मार्च) 'ओ तेरी' सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. या स्क्रिनिंगला बॉलिवूडच्या अनेक स्टार्सनी उपस्थिती लावली. या सेलिब्रिटींमध्ये संगीता बिजलानी, डेजी शाह, समीर सोनी आणि त्यांची पत्नी नीलम कोठारी आणि स्वीडिश ग्रीक अभिनेत्री एली अवरामसह अनेक प्रसिध्द स्टार्स दिसले.
'ओ तेरी' हा सिनेमा आज (28 मार्च) देशभरातील थिएटरमध्ये झळकला. उमेश बिष्टीच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या सिनेमाची सलमान खानचा भावोजी अतुल अग्निहोत्रीने निर्मिती केली आहे. सिनेमात 'बिट्टू बॉस' आणि 'जय हो'सारख्या सिनेमात दिसलेला पुलकित सम्राट आणि या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा बिलाल अमरोहीची मुख्य भूमिका आहे. सोबतच सिनेमात मंदिरा बेदी, सारा जेन डायससुध्दा महत्वपूर्ण भूमिकेत आहे. सलमाननेसुध्दा एक छोटी भूमिका साकारली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा 'ओ तेरी' सिनेमाच्या स्क्रिनिंगला पोहोचलेल्या स्टर्सची काही खास छायाचित्रे...