आजची तरुणाई करिअरविषयी जास्त गंभीर झाली आहे. पूर्वी लग्नाचे वय 20 ते 25 पर्यंत असायचे, मात्र आता करिअरमुळे तरुण-तरुणी वयाच्या तिशी-पस्तीशीत लग्न करण्यावर भर देतात.
फिल्मी इंडस्ट्रीतील अनेक स्टार्स करिअरमध्ये सेटल होऊन वयाच्या तिशीनंतरच लग्नगाठीत अडकतात. मात्र येथे काही स्टार्स असेही आहे, ज्यांनी करिअरमध्ये स्थिरावण्यापूर्वीच लग्नाचा निर्णय घेतला. करिअरमध्ये यशोशिखर गाठण्यापूर्वी या स्टार्सनी प्रेमाला पसंती देत लग्न केले.
यामध्ये सर्वप्रथम नाव हे बॉलिवूडचा किंग अर्थातच
शाहरुख खानचे येते. स्टारपद मिळवण्यापूर्वीच शाहरुखने गौरीसोबत लग्न केले. 1991मध्ये हे दोघे लग्नगाठीत अडकले. लग्नाच्या वर्षभरानंतर म्हणजे 1992मध्ये शाहरुखचा 'दीवाना' हा पहिला सिनेमा रिलीज झाला होता. त्यापूर्वी त्याने 'फौजी' या टीव्ही मालिकेत काम केले होते.
पुढे वाचा, आणखी कोणत्या स्टार्सनी स्टारपद मिळण्यापूर्वी लग्नाचा निर्णय घेतला...