आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बेबी'च्या स्पेशल स्क्रिनिंगला या कारवर खिळल्या फिल्म स्टार्सच्या नजरा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(विंटेज कारला बघताना अक्षय कुमार आणि मधुरिमा तुली, मागे फोटो काढून घेताना अनुपम खेर)
मुंबईः शुक्रवारी 'बेबी' या सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग मुंबईतील लिबर्टी थिएटरमध्ये आयोजित करण्यात आले होते. या स्क्रिनिंगला अक्षय कुमार, मधुरिमा तुली, अनुपम खेर, प्रिती झंगियानी, राणा डग्गुबत्ती, रजित कपूर आणि केतन मेहतासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
यावेळी अक्षय कुमार स्क्रिनिंगला आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करताना दिसला. विशेष म्हणजे स्क्रिनिंगस्थळी लाल रंगाची एक विंटेज कार ठेवण्यात आली होती. येथे पोहोचलेल्या सर्व कलाकारांच्या नजरा या कारवर खिळल्या होत्या.
अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेला 'बेबी' हा सिनेमा शुक्रवारी रिलीज झाला असून समीक्षकांच्या चांगल्या प्रतिक्रिया सिनेमाला मिळाल्या आहेत. भूषण कुमार, कृष्ण कुमार आणि शीतल भाटिया या सिनेमाचे निर्माते आहेत. अक्षयसह अनुपम खेर, तापसी पन्नू, मधुरिमा तुली, राणा डग्गुबत्ती, के.के. मेनन महत्त्वपूर्ण भूमिकेत सिनेमात झळकले आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'बेबी'च्या स्क्रिनिंगला पोहोचलेल्या स्टार्सची खास छायाचित्रे...