मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा, श्रध्दा कपूर, जॅकलिन फर्नांडिससह अनेक अभिनेत्री बुधवारी ग्रॅजिया यंग फॅशन अवॉर्ड्स सोहळ्याच्या निमित्ताने एकत्र आल्या होत्या. मुंबईच्या लीला हॉटेलमध्ये हा अवॉर्ड सोहळा आयोजित करण्यात आला होता. या अभिनेत्रींनी
आपल्या ग्लॅमरस अंदाजाने रेड कार्पेटवर अवतरुन सोहळ्याला चारचाँद लावले.
इव्हेंटमध्ये प्रियांकाने ब्लॅक लाँग स्लिव्ज डिझाइनर ड्रेस परिधान केला होता. तर श्रध्दा ब्लू अँड गोल्डन मिनी ड्रेसमध्ये दिसली. जॅकलिनने डिझाइनर अरमानीचा ब्लू अँड ब्लॅक आऊटफिट परिधान केले होते.
नर्गिस फाखरी, हुमा कुरेशी, सुरवीन चावला, लीसा हेडन, उर्वशी रौतेलासह
अर्जुन कपूर यांचाही खास अंदाज यावेळी पाहायला मिळाला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा ग्रॅजिया अवॉर्ड्सच्या रेड कार्पेटवर अवतरलेल्या सेलेब्सची खास झलक...