मुंबई- मुंबईमध्ये काल (10 डिसेंबर) 'मुंबई कॅन डान्स साला' या आगामी सिनेमाचे म्युझिक लाँच करण्यात आले. यावेळी
राखी सावंत, भारती, इमाम सिद्दीकी, फैजल खान, शक्ती कपूर, वाजिद अली, सचिंद्र शर्मा, रंजीत शर्मा, परेश गंतारा, आशिमा शर्मा आणि प्रशांत नारायणसह अनेक बॉलिवूड सेलेब्स दिसले.
राखी या इव्हेंटमध्ये ब्लॅक आउटफिटमध्ये दिसून आली. 'मुंबई कॅन डान्स साला' सचिंद्र शर्माने दिग्दर्शित केला आहे. सिनेमात आशिमा शर्मा, प्रशांत नारायण, आदित्य पांचोली, शक्ती कपूर, राखी सावंत, किराण जनजानी आणि मुकेश तिवारी यांच्या मुख्य भूमिका आहेत.
सिनेमा रंजीत शर्माने निर्मित केला असून बप्पी लहरी यांनी म्युझिक दिले आहे. 2 जानेवारी रोजी हा सिनेमा थिएटरमध्ये झळकणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा म्यूझिक लाँचिंग इव्हेंटमध्ये पोहोचलेल्या सेलेब्सची छायाचित्रे...