आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिग्दर्शक रवी चोप्रा अनंतात विलीन, बॉलिवूडकरांनी दिला अखेरचा निरोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेता गोविंदा आणि अभिषेक बच्चन)

मुंबई- प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते रवी चोप्रा यांच्या पार्थिवावर आज (13 नोव्हेंबर) विले पार्ले येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. गोविंदा, अभिषेक बच्चन, शरद सक्सेना, मुकेश खन्ना, निर्माते मुकेश भट्ट, दिग्दर्शक रमेश सिप्पी, सुभाष घई, पुनीत मल्होत्रा, गायक नितिन मुकेश आणि अर्चना पूरण सिंह यांच्यासह अनेक कलाकार त्यांच्या अंत्य यात्रेत सहभागी झाले होते.
बुधवारी दुपारी 3 वाजता रवी चोप्रा यांचे निधन झाले होते. ते 68 वर्षांचे होते. फुफ्फुसाच्या कर्करोगाने गेल्या काही वर्षांपासून ते आजारी होते. 'महाभारत' ही गाजलेली टीव्ही मालिका रवी चोप्रा यांनी दिग्दर्शित केली होती.
रवी चोप्रा प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते बी. आर. चोप्रा यांचे चिरंजीव आणि यश चोप्रा यांचे पुतणे होते. त्यांनी जमीर (१९७५), द बर्निंग ट्रेन (१९८०), मजदूर (१९८३), दहलीज (१९८६), बागबान (२००३) आणि बाबुल (२००६) या सिनेमांचे दिग्दर्शन केले होते. याशिवाय ' भूतनाथ ' आणि 'भूतनाथ रिटर्न्स' या सिनेमांची निर्मिती त्यांनी केली.
पुढे पाहा, रवी चोप्रा यांच्या अंत्य यात्रेत सहभागी झालेल्या कलाकारांची छायाचित्रे...