आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनाक्षीने वहिनी आणि भावांसोबत पाहिला \'द एवेंजर्स...\', अनेक सेलेब्सही पोहोचले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडून - सोनाक्षी सिन्हा, भाऊ लव, वहिनी तरुणा आणि भाऊ कुश)
मुंबईः बुधवारी मुंबईत 'द एवेंजर्सः एज ऑफ अल्टर्न' या हॉलिवूड सिनेमाचा प्रीमिअर आयोजित करण्यात आला होता. पीव्हीआरमध्ये ठेवण्यात आलेल्या या प्रीमिअरला बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिचे दोन्ही भाऊ लव-कुश आणि वहिनी तरुणासोबत पोहोचली होती.
सोनाक्षीच्या कुटुंबाव्यतिरिक्त अभिनेता वरुण धवन, श्रद्धा कपूर, हुमा कुरैशी, यामी गौतम, राकेश ओमप्रकाश मेहरा, मसाबा गुप्ता आणि तिचा भावी पती मधु मंतेना, साजिद खान, यामी गौतम, फराह खान, रितेश देशमुख, त्याची पत्नी जेनेलिया देशमुख पोहोचले होते. वरुण, श्रद्धा आणि सोनाक्षी यावेळी मस्तीच्या मूडमध्ये दिसले.
'द एवेंजर्सः एज ऑफ अल्टर्न' हा सिनेमा 2012 मध्ये आलेल्या द एवेंजर्स या सिनेमाचा सिक्वेल आहे. जोस व्हेडन यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला असून स्कारलेट जोहांसन, रॉबर्ट दाउनी जूनियर, एलिजाबेथ ओल्सेन, मार्क रफेलो आणि क्रिस हेम्सवर्थ यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका सिनेमात आहेत. 24 एप्रिल रोजी हा सिनेमा भारतात रिलीज होतोय.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा प्रीमिअरला पोहोचलेल्या सेलेब्सची खास झलक...