आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Celebs Attend Sanjay Hinduja Wedding Ceremony

लंडनस्थित अब्जाधीशाच्या लग्नात जमली सेलेब्सची मांदियाळी, पाहा INSIDE PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रेः प्रिती झिंटा, नववधू अनू मेहतानीसोबत मनीष मल्होत्रा)
उदयपूरः हिंदुजा ग्रुपचे चेअरमन संजय हिंदूजा आणि डिझायनर अनु मेहतानी यांच्या शाही लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आहे. या लग्नात सहभागी होण्यासाठी अनेक हॉलिवूड आणि बॉलिवूड स्टार्स मंगळवारी लेकसिटीत दाखल झाले. शहरात तीन वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये लग्नाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. बुधवारी संगीत आणि मेंदी सेरेमनी झाली. मुख्य समारंभ गुरुवारी आहे. या कार्यक्रमात जेनिफर लोपेज सादरीकरण करणार आहे.
सिनेसृष्टीतून प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी, श्रद्धा कपूर, प्रिती झिंटा, अभिनेता डिनो मारिया, चंकी पांडे, संजय कपूर, सोनाक्षी सिन्हाचा भाऊ लव सिन्हा, शशी कपूर यांची बहीण ऋतू कपूर, उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांचे चिरंजीव आदित्य मित्तल शाही लग्नसोहळ्यात सहभागी होण्यासाठी उदयपुरमध्ये दाखल झाले आहेत.
सिटी पॅलेसच्या माणक चौकात आकर्षक सजावट करण्यात आली आहे. बुधवारी पार पडलेल्या संगीत कार्यक्रमात पॉप सिंगर निकोल आणि बॉलिवूडमधील अनेक कलाकार सादरीकरण केले. या कार्यक्रमात अभिनेत्री प्रिती झिंटा, रश्मी निगम, फिटनेस ट्रेनर डिएना पांडे, मनीष मल्होत्रा, सोफी चौधरीसह अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले हहोते. या कार्यक्रमाची काही छायाचित्रे सोशल नेटवर्किंग साइट ट्विटरवर सेलिब्रिटींनी शेअर केली आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा शाही लग्नाच्या विधीत सहभागी झालेल्या सेलिब्रिटींची खास छायाचित्रे..