(हुमा कुरैशी, तब्बू आणि साजिद खान)
मुंबईतील लाइटबॉक्स थिएटरमध्ये आयोजित हमशकल्स या सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंगला सेलिब्रिटींची मांदियाळी जमली होती. या सिनेमाचा दिग्दर्शक साजिद खान आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी थिएटरमध्ये हजर होता. बॉलिवूडमधील इतर कलाकारांप्रमाणेच दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर फराह खान आपल्या भावाला शुभेच्छा देण्यासाठी आवर्जुन उपस्थित होती. येथे फराह तिचे पती शिरीष कुंदर आणि मुलांसह पोहोचली होती.
या सिनेमाच्या स्क्रिनिंगनंतर फराहने मायक्रोब्लॉगिंग वेबसाइट
ट्विटरवर लिहिले, की हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगला चालेल, अशी मला आशा आहे. पुढे फराहने लिहिले, ती आपल्या भावासाठी नर्व्हस आहे. मात्र ट्रेलर एवढा फनी आहे, तर सिनेमा किती फनी असेल.
कोणकोण पोहोचले स्क्रिनिंगला...
या स्क्रिनिंगला अरबाज खान, हुमा कुरैशी, जाएद खान, सोनू सूद, तब्बू आणि नेहा शर्मा, हेलन, वहीदा रहमान, प्रेम चोप्रा, आशा पारेख, सलीम खान यांच्यासह बरेच सेलेब्स पोहोचले होते.
या सिनेमात
सैफ अली खान, रितेश देशमुख आणि राम कपूर यांनी तिहेरी भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय तमन्ना भाटिया, बिपाशा बसू आणि ईशा गुप्ता यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका सिनेमात आहेत.
नाइट टाइम फन म्हणून चर्चा असलेल्या या सिनेमाने प्रेक्षकांची मात्र निराशा केल्याचे दिसून येत आहे. अनेक समीक्षकांनी या सिनेमाला शुन्य स्टार दिला आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'हमशकल्स'च्या स्क्रिनिंगला पोहोचलेल्या बी टाऊन स्टार्सची छायाचित्रे...