आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Celebs Attend The Screening Of Oscar Nominated 'Birdman'

हॉलिवूड सिनेमाच्या स्क्रिनिंगमध्ये दिसली बिग बींची मुलगी, हृतिक रोशन आणि अनेक सेलेब्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(श्वेता नंदा आणि हृतिक रोशन)
मुंबईः शुक्रवारी मुंबईत ऑस्करसाठी नामांकन प्राप्त करणा-या 'बर्डमॅन' या हॉलिवूड सिनेमाचे खास स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते. यावेळी अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता नंदा, हृतिक रोशन, अमित साध, ऋचा चड्ढा, कुणाल कपूर आणि चंकी पांडेसह अनेक सेलिब्रिटी दिसले. लाइट बॉक्स थिएटरमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी हे स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते.
माइकल काटन, एडवर्ड नॉर्टन, एमा स्टोन आणि नाओमी वाट्स स्टारर 'बर्डमॅन' हा सिनेमा गेल्या वर्षी 17 ऑक्टोबर रोजी रिलीज झाला होता. या सिनेमाला ऑस्करमध्ये नऊ नामांकने मिळाली आहेत. यंगिस्तान या बॉलिवूड सिनेमालासुद्धा ऑस्करसाठी पाठवण्यात आले होते. मात्र हा सिनेमा नॉमिनेशनमध्ये सामील होऊ शकला नाही.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'बर्डमॅन'च्या स्क्रिनिंगला पोहोचलेल्या बॉलिवूड स्टार्सची छायाचित्रे...