आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS : दहीहंडी उत्सव, जेव्हा शाहरुख बनला गोविंदा, हृतिकने केला डान्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः दहीहंडी उत्सवात शाहरुख खान आणि हृतिक रोशन)
मुंबई - गोकुळाष्टमीचा सण संपूर्ण देशभरात उत्साहात साजरा करण्यात आला. मायानगरी मुंबईत या उत्सवाची धूम मोठ्या प्रमाणात होती. ठिकठिकाणी दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. मानवी मनोरे रचून दहीहंडी फोडण्यात आली. यावेळी बॉलिवूड सेलिब्रिटींनी विविध ठिकाणी हजेरी लावून गोविंदाचा उत्साह वाढवला.
अनेक स्टार्स स्वतः गोविंदाच्या रुपात मानवी मनो-यांवर चढून दहीहंडी फो़डताना दिसली. तर जास्तीत जास्त स्टार्स उपस्थितांचे मनोरंजन केले. शाहरुख खान, हृतिक रोशन यांच्यापासून ते जितेंद्र, प्रेम चोप्रा, अर्जुन रामपाल, बिपाशा बसू, राणी मुखर्जीसह अनेक सेलेब्स दहीहंडी कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी अनेकांनी तालसुद्धा धरला. अभिनेते जितेंद्र दरवर्षी दहीहंडी कार्यक्रमात सहभागी होत असतात.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा दहीहंडी उत्सवात सहभागी झालेल्या बी टाऊन स्टार्सची खास छायाचित्रे...