आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणपती बाप्पा मोरयाः 11 दिवसांसाठी बॉलिवूडमध्येसुद्धा वाजत-गाजत होते श्रींचे आगमन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(गेल्यावर्षी डान्स करत गणेशाला घरी नेताना अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्र)
मुंबई - आज देशभरात गणेश चतुर्थीचा सण उत्साहात साजरा केला जातोय. घरोघरी बाप्पाचे आगमन होत आहे. पुढील अकरा दिवस बाप्पा विराजमान असणार आहेत. गणेश चतुर्थीची धूम बॉलिवूडमध्येही दिसून येते. अनेक सेलिब्रिटी आपल्या घरी श्रींची प्रतिष्ठापना करुन त्यांची पूजाअर्चा करतात. शिल्पा शेट्टी, अक्षय कुमार, काजोल, बप्पी लहरी, गोविंदा, जितेंद्र, प्रियांका चोप्रा, रणबीर कपूर, विवेक ओबरॉय, नाना पाटेकर, हृतिक रोशनसह बी टाऊनच्या अनेक सेलिब्रिटींच्या घरी दीड किंवा अकरा दिवस गणपती वास्तव्याला असतात. या सर्वांसह सुपरस्टार सलमान खानसुद्धा मोठ्या उत्साहाने हा सण साजरा करतो.
मुंबईतील लालबागच्या राजावर अनेकांची खूप श्रद्धा आहे. सामान्यांपासून ते बॉलिवूड कलाकारांपर्यंत सर्वजण राजाच्या दर्शनासाठी आवर्जुन जात असतात. बी टाऊनसोबतच टीव्ही इंडस्ट्रीतील कलाकारांसाठीसुद्धा हा सण खूप खास असतो.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला बी टाऊन आणि टीव्ही इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींची गणेश आराधनाची खास झलक दाखवत आहोत. गेल्या वर्षी या सेलिब्रिटींनी कसा हा सण साजरा केला, हे बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...