आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Many Bollywood Celebs Snapped At Aamir Khan\'s PK Screening At Yashraj Studio

\'PK\'च्या स्क्रिनिंगला एकत्र आले बॉलिवूडचे सेलिब्रिटी, आमिर-अनुष्कासुद्धा पोहोचले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अनुष्का शर्मा (डावीकडे), पोलिस कर्मचा-यांची भेट घेताना आमिर खान)
मुंबईः गुरुवारी यशराज स्टुडिओमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींची मांदियाळी पाहायला मिळाली. निमित्त होते आज रिलीज झालेल्या आमिर खानच्या 'पीके' सिनेमाच्या खास स्क्रिनिंगचे. स्क्रिनिंगपूर्वी आमिर खान पोलिस कर्मचा-यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत कॅमे-यासमोर पोज देताना दिसला. स्क्रिनिंगला सिनेमाच्या निर्माता आणि दिग्दर्शकासोबत बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी पोहोचले होते.
सिनेमाचे दिग्दर्शक राजकुमार हिराणी आणि निर्माते विधू विनोद चोप्रा स्क्रिनिंगला आलेल्या सेलिब्रिटींचे स्वागत करताना दिसले. यावेळी राजकुमार हिराणी आपल्या पत्नी आणि कुटुंबीयांसोबत स्क्रिनिंगला आले होते. सिनेमातील लीड अॅक्ट्रेस अनुष्का शर्मा यावेळी कूल मूडमध्ये दिसली.
या स्क्रिनिंगला शबाना आझमी, इमरान खान, सोनम कपूर, सौरभ कपूर, अन्नू मलिक, नीरज वोरा, परिक्षीत साहनी, राजकुमार राव, शर्मन जोशी, नील नितिन मुकेश, किरण रावसह बरेच सेलिब्रिटी पोहोचले होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'पीके'च्या स्क्रिनिंगला पोहोचलेल्या बॉलिवूड सेलिब्रिटींची निवडक छायाचित्रे...