आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'महाभारत\'च्या दिग्दर्शकाचे निधन, राणीसह या कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(राणी मुखर्जी, आदित्य चोप्रा, कतरिना कैफ आणि हेमामालिनी)

मुंबई- 'महाभारत' या प्रसिद्ध टीव्ही मालिकेचे दिग्दर्शक रवी चोप्रा यांचे 12 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता निधन झाले. ते 68 वर्षांचे होते. फुफ्फुसाच्या कर्करोगाने गेल्या काही वर्षांपासून ते आजारी होते. अलीकडेच प्रकृती खालावल्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे.
बुधवारी निर्माते आदित्य चोप्रा, त्यांची पत्नी राणी मुखर्जी, हेमा मालिनी, रणवीर कपूर, अर्जुन कपूर, संजय खान यांच्यासह अनेक कलाकार रवी चोप्रा यांना श्रद्धांजली देण्यासाठी पोहोचले होते.
रवी चोप्रा प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते बी. आर. चोप्रा यांचे चिरंजीव आणि यश चोप्रा यांचे पुतणे होते. त्यांनी जमीर (१९७५), द बर्निंग ट्रेन (१९८०), मजदूर (१९८३), दहलीज (१९८६), बागबान (२००३) आणि बाबुल (२००६) या सिनेमांचे दिग्दर्शन केले होते. याशिवाय ' भूतनाथ ' आणि 'भूतनाथ रिटर्न्स' या सिनेमांची निर्मिती त्यांनी केली.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा रवी चोप्रा यांनी श्रद्धांजली वाहण्यासाठी पोहोचलेल्या कलाकारांची छायाचित्रे...