आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'Day: शर्मिला टागोरसह बॉलिवूडमधील या स्टार्सनीसुध्दा बदलला आहे धर्म

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- शर्मिला टागोर आणि धर्मेंद्र)
मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री शर्मिला टागोर 70 वर्षांच्या झाल्या आहेत. 8 डिसेंबर 1944 रोजी त्यांचा जन्म हैदराबाद येथे झाला. बंगाली कुटुंबात जन्मलेल्या शर्मिला यांच्या आईचे नाव इरा बरुआ आणि वडिलांचे नाव गीतेंद्रनाथा टागोर होते. 1959मध्ये सत्यजीत रे यांच्या 'अपूर संसार' या बंगाली सिनेमातून त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले. त्यांनी आपल्या काळात 'कश्मीर की कली' (1964), 'एन इवनिंग इन पॅरिस' (1967), 'आराधना' (1969), 'अमर प्रेम' (1972), 'दाग' (1973) आणि 'मौसम' (1975)सारख्या बॉलिवूड सिनेमांत काम केले.
धर्म बदलून केले लग्न-
शर्मिला टागोर -
एकेकाळी बंगाली ब्युटी शर्मिला टागोर यांची गणना बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये होत होती. त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. शर्मिला आजही त्यांच्या बालपणीच्या नावाने ओळखले जाते. परंतु त्यांनी लग्नाच्या वेळी आपले नाव बदलले होते. 27 डिसेंबर 1969 रोजी त्यांनी भारतीय क्रिकेट टीमचे माजी कर्णधार दिवंगत मसू अली खान पटौदीसोबत निकाह केला होता. लग्नानंतर त्यांनी इस्लाम धर्माचा स्वीकार करुन आपले नाव आएशा सुल्तान खान ठेवले होते. त्यांना तीन मुले असून सैफ अली खान, शभा अली खान आणि सोहा अली खान ही त्यांची नावे आहेत. सैफ बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आहे. सोहा अभिनेत्री आहे तर शबा एक ज्वेलरी डिझायनर आहे.
शर्मिला टागोरच नव्हे बॉलिवूड अनेक स्टार्स आहेत ज्यांनी आपला धर्म बदलला आहे. त्यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...