आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Couples Attend Manish Malhotra\'s Niece Reception

PHOTOS: मनीष मल्होत्राच्या भाचीच्या रिसेप्शनमध्ये पोहोचले हे बॉलिवूड कपल्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(माधुरी दीक्षित पती श्रीराम माधव नेनेंसोबत आणि ट्विंकल खन्ना पती अक्षय कुमारसोबत)
मुंबईः बॉलिवूडचे प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांची भाची रिद्धी अलीकडेच लग्नगाठीत अडकली. तेजस तळवलकर हे रिद्धीच्या पतीचे नाव आहे. लग्नानंतर मुंबईतील जे डब्ल्यू मॅरिएटमध्ये रिद्धी आणि तेजसे ग्रॅण्ड वेडिंग रिसेप्शन आयोजित करण्यात आले होते. या नवदाम्पत्याला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा द्यायला अनेक बॉलिवूड कपल्स रिसेप्शन पार्टीत सहभागी झाले होते.
अक्षय कुमार पत्नी ट्विंकल खन्नासोबत पार्टीत दाखल झाला. यावेळी ट्विंकल ट्रेडिशनल लूकमध्ये तर अक्षय सूटमध्ये दिसला. दुसरीकडे अभिनेत्री श्रीदेवी पती बोनी कपूरसोबत, माधुरी दीक्षित पती श्रीराम नेनेंसोबत यावेळी दिसली. विद्या बालनसुद्धा आपल्या पतीसोबत नवदाम्पत्याला शुभेच्छा द्यायला पोहोचली होती. यावेळी विद्या रेड साडी आणि सिद्धार्थ ब्लॅक सूटमध्ये दिसले.
दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर यांनीही सपत्नी या पार्टीत हजेरी लावली होती. कॉमेडियन जॉनी लिव्हर पत्नी सुजाता आणि मुलासोबत येथे आले होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा रिसेप्शनमध्ये पोहोचलेल्या बॉलिवूड कपल्सची खास झलक...