आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PICS: फिल्मफेअरच्या रंगारंग सोहळ्यात आपल्या बेटर-हाफसोबत पोहोचले हे सेलिब्रिटी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडून - दीया मिर्झा आणि तिचे पती साहिल संघा, माधुरी दीक्षित आणि तिचे पती डॉ. श्रीराम नेने, सोनाली बेंद्रे आणि तिचे पती गोल्डी बहल)
रेड कार्पेटवर अवतरलेले तारे-तारका...सुपरस्टार्सचे डोळे दिपवणारे परफॉर्मन्सेस...फॅशनचा झगमगाट हा सगळा ग्लॅमरस माहोल रंगला 60व्या ब्रिटानिया फिल्मफेअर पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये. यशराज स्टुडियोमध्ये शनिवारी रात्री उशिरापर्यंत हा दिमाखदार सोहळा रंगला. या सोहळ्यात बॉलिवूडमधील तारे-तारकांची मांदियाळी जमली होती.
रेखा, अमिताभ बच्चन, सलमान खान, जया बच्चन, तब्बू, मनीषा कोईराला, शाहीद कपूर, श्रद्धा कपूर, सनी लिऑन, वरुण धवन, अर्जुन कपूर, आलिया भट्ट, अली फजल, गुरमित चौधरीसह अनेक सेलिब्रिटी या सोहळ्यात आवर्जुन उपस्थित होते.
विशेष म्हणजे काही सेलिब्रिटी आपल्या बेटर हाफ अर्थातच जोडीदारासोबत सोहळ्यात पोहोचले होते. माधुरी दीक्षित-डॉ. श्रीराम नेने, सोनाली कुलकर्णी आणि तिचे पती, मुकेश भट्ट आणि त्यांच्या पत्नी, दीया मिर्झा आणि तिचे पती यासह आर माधनवसुद्धा आपल्या पत्नीसोबत सोहळ्यात सहभागी झाला होता.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला फिल्मफेअरमध्ये आपल्या जोडीदारासोबत सहभागी झालेल्या सेलिब्रिटींची खास झलक दाखवत आहोत...