आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Fall In Love Of Mararhi; Duniyadari, Timepass Liked To Sharukh

बॉलिवूडला वेड लागले मराठीचे!,दुनियादारी, टाइमपासच्या यशाची शाहरुखला भुरळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गेल्या काही वर्षांत मराठीत दर्जेदार चित्रपटांची निर्मिती व प्रचंड व्यवसाय होऊ लागल्याने बॉलिवूडकरांनाही आता मराठीची भुरळ पडली आहे. शाहरुख खान व दिग्दर्शक रोहित शेट्टी मराठीत सहा चित्रपटांची निर्मिती करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
रवी जाधव यांच्या ‘टाइमपास’ या चित्रपटाने आजवर 30 कोटींवर कमाई केली. तसेच गेल्या वर्षी आलेल्या ‘दुनियादारी’ आणि ‘बालक- पालक’ चित्रपटांनीही कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली. त्यामुळे आता बॉलिवूडच्या अनेकांना मराठीत रस वाटत आहे. यापूर्वी रितेश देशमुखने बालक- पालक (बीपी) या चित्रपटाची निर्मिती केली, तर अक्षयकुमार याने ‘72 मैल’ या चित्रपटात लक्ष घातले होते. शिवाय यावर्षी रितेश देशमुख 'लई भारी' या मराठी सिनेमात झळकणारसुद्धा आहे.
शाहरुख व रोहितही आता सहा मराठी चित्रपटांची निर्मिती करणार आहेत. यातील तीन चित्रपट हे आधी तयार करण्यात येतील. तसेच शाहरुख एका चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका करणार आहे.
रोहित शेट्टीच्या हिंदी चित्रपटांतही अनेक मराठी कलाकार झळकले आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांचे अल्प मानधन व जबरदस्त कौशल्य. त्याच्या ‘सिंघम’ या लोकप्रिय चित्रपटात तब्बल 16 मराठी कलाकार झळकले होते. यात अजय देवगणने मराठमोळा बाजीराव 'सिंघम' साकारला होता. तसेच 'सिंघम'चे संगीत हे अजय- अतुल यांनी दिले होते. त्यामुळे रोहितने मराठी चित्रपट केल्यास आश्चर्य वाटायला नको.