आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'दावत-ए-इश्क\'च नव्हे, या सिनेमांचेही टायटल्स होते खाण्यावर आधारित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('दावत-ए-इश्क'च्या एका सीनमध्ये आदित्य राय कपूर आणिम परिणीती चोप्रा)
परिणीती चोप्रा आणि आदित्य राय कपूर अभिनीत 'दावत-ए-इश्क' सिनेमा स्वादिष्ट पदार्थांवर आधारित आहे. सिनेमात स्वयंपाकात निपूण असलेला नायक नायिकेला पटवण्यासाठी विविध पदार्थ बनवतो. सिनेमाचे दोन्ही मुख्य स्टार्स सिनेमाचे प्रमोशनसुध्दा फूड यात्रेने करत आहेत.
सिनेमात आचा-याची भूमिका साकारणा-या आदित्यने सांगितले, 'मला कोणतीच ट्रॅडिशनल डिश बनवता येत नाही. फक्त मॅगी आणि आम्लेट बनवू शकतो. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान मी कोणताही पदार्थ बनवायला शिकलो नसलो तरी किचन सांभाळणे शिकलो आहे.'
आदित्य म्हणतो, 'हा सिनेमा पदार्थांवर आधारित असला तरी त्यात तुम्हाला पाहण्यासारखे खूप काही आहे. तुम्हाला प्रत्येकवेळी खाण्याचेच पदार्थच दाखवले जातील असे नाही. हा एक म्यूजिकल रोमँटिक सिनेमा आहे. त्यामध्ये प्रत्येकाला स्वत:ची प्रेमकथा दिसते.'

मात्र, पदार्थांवर बेतलेला बॉलिवूडचा हा पाहिलाच सिनेमा नाहीये. यापूर्वीसुध्दा लंच बॉक्स, बावर्ची आणि चीनी कमसारखे शिर्षक असलेले आणि जेवणाच्या संकल्पनेवर आधारित अनेक सिनेमे रिलीज झालेले आहेत. काहींमध्ये नायक आचारी बनले तर काहींमध्ये खाण्यापासूनच लव्हस्टोरी सुरु झालेली दाखवली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या पदार्थांच्या संकल्पनेवर बनलेल्या सिनेमांविषयी...