आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अफेअर असो किंवा लग्न, प्रेम तपासून बघण्यासाठी लिव्ह इनमध्ये होते हे 22 सेलेब्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो - रणवीर शौरी आणि कोंकणा सेन शर्मा)
आज आपल्या समाजात लिव्ह इन रिलेशनशिप सामान्य बाब झाली आहे. असे म्हटले जाते, की बलिवूडमध्ये राज बब्बर आणि स्मिता पाटील यांनी लिव्ह इन रिलेशनशिपला सुरुवात केली. तसे पाहता स्टार्सचे खासगी आयुष्य नेहमीच लाइमलाइटमध्ये असते. त्यामुळे हे कलाकार कुणासोबत डेट करतात, कुठे फिरतात, कुणासोबत राहात आहेत, या सर्वांची बरीच चर्चा रंगत असते.
ऐंशीच्या दशकात मात्र लिव्ह इनमध्ये राहणे हे मोठे धाडसी पाऊल होते. राज बब्बर यांनी समाजाच्या सर्व बंधनांना झुगारुन स्मिता पाटील यांच्यासह लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचे धाडस दाखवले. यामुळे त्यांच्यावर बरीच टीकासुद्धा झाली. काही दिवसांनी राज आणि स्मिता यांनी लग्नदेखील केले.
आताच्या काळात तर बॉलिवूडमध्ये लिव्ह-इनमध्ये राहणे कल्चर बनले आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आता तर काही वर्षे लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर ब-याच सेलेब्सनी आपले नाते संपुष्टात आणले. तर काहींनी काही वर्षे लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर लग्न केले.
आज आम्ही तुम्हाला लिव्ह-इनमध्ये राहणा-या आणि पूर्वी राहत असलेल्या बी टाऊनच्या स्टार्सबद्दल सांगतोय. जाणून घ्या कोणकोणते स्टार्स लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहेत किंवा होते...
रणवीर शौरी आणि कोंकणा सेन शर्मा
अभिनेता रणवीर शौरीचे नाव एकेकाळी पूजा भट्टसोबत जुळले होते. बातम्यांनुसार, हे दोघे सीरिअस रिलेशनशिपमध्ये होते, मात्र काही दिवसांतच यांचे नाते संपुष्टात आले. रणवीरची गणती लिव्ह इनमध्ये राहणा-या सेलिब्रिटींमध्ये केली जाते. रणवीर कोंकणा सेनसह लिव्ह इनमध्ये होता. या दोघांनी 2008 मध्ये साखरपुडा केला आणि सप्टेंबर 2010 मध्ये हे दोघे लग्नगाठीत अडकले. या दोघांना एक मुलगासुद्धा आहे. आता रणवीर आणि कोंकणासुद्धा विभक्त झाले आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या अशाच आणखी काही सेलब्सविषयी...